खासदार मनेका गांधी पशुवैद्य डॉ. विकास शर्मा यांच्याशी ज्या पध्दतीने बोलल्या त्यातून पशुवैद्यकीय महाविद्यालय जबलपूर हे घटिया दजार्चे असल्याचे सिद्ध होत नाही, परंतु यामुळे मेनका गांधी अत्यंत घटिया महिला असल्याचे सिद्ध होते. त्या माझ्या पक्षाचा खासदार आहेत, याची मला लाज वाटते, असा आरोप मध्य प्रदेशचे माजीआरोग्यमंत्री आणि पाटणचे भाजपाचे आमदार अजय बिष्णोई यांनी ट्वीट करून केला आहे.Not Veterinary College but Maneka Gandhi Ghatia, BJP MLA’s criticism
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : खासदार मनेका गांधी पशुवैद्य डॉ. विकास शर्मा यांच्याशी ज्या पध्दतीने बोलल्या त्यातून पशुवैद्यकीय महाविद्यालय जबलपूर हे घटिया दजार्चे असल्याचे सिद्ध होत नाही, परंतु यामुळे मेनका गांधी अत्यंत घटिया महिला असल्याचे सिद्ध होते. त्या माझ्या पक्षाचा खासदार आहेत, याची मला लाज वाटते, असा आरोप मध्य प्रदेशचे माजीआरोग्यमंत्री आणि पाटणचे भाजपाचे आमदार अजय बिष्णोई यांनी ट्वीट करून केला आहे.
व्हायरल झालेल्या ऑडिओ टेपमध्ये मेनका गांधी जबलपूरच्या नानाजी देशमुख पशुवैद्यकीय विद्यापीठाचे पशुवैद्यकीय डॉक्टर विकास शर्मा यांच्याशी संभाषण करीत आहेत. या दरम्यान त्यांनी संपूर्ण पशुवैद्यकीय महाविद्यालयाला घटिया म्हटले होते. हा ऑडिओ २१ जूनचा आहे.
डॉ. विकास शर्मा आणि डॉ. एल.एन. गुप्ता यांनी एका श्वानावर शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर त्याची प्रकृती खालावली. डॉक्टरांचा असा आरोप आहे की मेनका गांधींनी त्यांना फोन करून धमकावले आणि श्वानाच्या उपचारासाठी ७०,००० रुपये देण्यास सांगितले.
मात्र, त्यावरून आमदार अजय विष्णोई यांनी आपल्याच पक्षाच्या खासदारांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आहे. त्यांच्या विधानाने एकच खळबळ उडाली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App