प्रत्येक विवाहित पुरुषाला बलात्कारी म्हणणे योग्य नाही, स्मृति इराणी यांचे वैवाहिक बलात्काराच्या मुद्यावर भाष्य


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील प्रत्येक विवाहाचा निषेध करणे योग्य नाही्य वैवाहिक जीवनातील लैंगिक हिंसाचाराचे समर्थन केले जाऊ शकत नाही आणि कोणीही त्याचे समर्थन करत नाही. पण याच्या नावाखाली सर्व पुरुषांना बलात्कारी म्हणणे योग्य नाही, असे केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृति इराणी यांनी लोकसभेत स्पष्ट केले.Not every married man should be called a rapist, says Smriti Irani on marital rape

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार बिनॉय विश्वम यांच्या वैवाहिक जीवनातील लैंगिक हिंसा या प्रश्नाला इराणी उत्तर देत होत्या. त्या म्हणाल्या, वैवाहिक बलात्काराचे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. देशात ३० हून अधिक हेल्पलाइन आहेत, ज्या महिलांना मदत करतातवरिष्ठ सदस्यांना याची जाणीव आहे



की राज्यसभेतील कार्यपद्धतीचा नियम ४७ सध्या विचाराधीन विषयावर विस्ताराने परवानगी देत नाही. राज्य सरकारांच्या सहकायार्ने या देशातील महिलांना संरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सध्या भारतभर ३० हून अधिक हेल्पलाइन कार्यरत आहेत, ज्यांनी ६६ लाखांहून अधिक महिलांना मदत केली आहे.

याशिवाय, देशात ७०३ वन स्टॉप सेंटर कार्यरत आहेत आणि त्यांनी पाच लाखांहून अधिक महिलांना मदत केली आहे. केंद्राने राज्य सरकारांशी चर्चा करावी आणि त्यांच्याकडून रेकॉर्ड मागवावे, असे सदस्य सुचवत आहेत. मात्र आज या सभागृहात राज्य सरकारांच्या वतीने केंद्राला कोणतीही शिफारस करता येणार नाही.

भाजपा नेते सुशील मोदी यांनी विचारले की, सरकार वैवाहिक बलात्कार हा गुन्हा म्हणून ठेवण्याच्या बाजूने आहे किंवा त्याला गुन्हा म्हणून सूट देण्याच्या बाजूने. असे असेल तर मग लग्न संस्था संपुष्टात येईल. पत्नीने कबूल केले की नाही हे सिद्ध करणे कठीण आहे.

दिल्ली उच्च न्यायालयात वैवाहिक बलात्कारावर सुनावणी सुरू आहे. वैवाहिक बलात्काराची संवैधानिक वैधतेपासून तर लैंगिक संबंधांमध्ये महिलांच्या संमतीपर्यंत यात चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता यावर न्यायालय काय निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागले आहे.

दिल्ली उच्च न्यायालयात न्यायमूर्ती राजीव शकदर आणि सी हरी शंकर ४ याचिकांची एकत्रित सुनावणी करत आहे. या याचिकांमध्ये भारतीय दंड संहिता कलम ३७५ मधील अपवादाच्या तरतुदीच्या संवैधानिक वैधतेला आव्हान देण्यात आलंय.

कलम ३७५ बलात्काराच्या गुन्ह्याबाबत आहे. या प्रकरणात न्यायालय ऑल इंडिया डेमॉक्रेटिक वुमेन्स असोसिएशनसह एमिकस क्युरी असलेल्या वरिष्ठ वकील राजशेखर राव व रेबेका जोहन यांचंही म्हणणं विचारात घेत आहे.

Not every married man should be called a rapist, says Smriti Irani on marital rape

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात