विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अनिवासी भारतीय (एनआरआय) आणि भारतातील परदेशी नागरिकांना भारतातील स्थावर मालमत्तेचे संपादन आणि हस्तांतरण करण्यासाठी आरबीआयच्या पूर्व परवानगीची आवश्यकता नाही, असे रिझर्व्ह बॅँकेने म्हटले आहे.Non-resident Indians, foreign nationals do not need permission from the Reserve Bank to buy or sell property
रिझर्व्ह बँकेने बुधवारी सांगितले की, अनिवासी भारतीय आणि ओसीआयना भारतात शेतजमीन, फार्म हाऊस व्यतिरिक्त अन्य स्थावर मालमत्तेचे संपादन आणि हस्तांतरण करण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक नाही.
परकीय चलन नियमन कायद्याशी संबंधित सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने ओव्हरसीज सिटिझन्स आॅफ इंडियाद्वारे स्थावर मालमत्तेच्या संपादनासंदर्भात त्यांच्या विविध कार्यालयांमध्ये प्राप्त झालेल्या प्रश्नांनंतर हे स्पष्टीकरण जारी केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरील वृत्तपत्रांच्या अहवालांवर आधारित त्यांच्या विविध कार्यालयांमध्ये मोठ्या संख्येने प्रश्न मिळाले होते. त्यानंतर रिझर्व्ह बॅँकेकडून हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App