नितीश कुमारांचे जेडीयू उत्तर प्रदेश, मणिपूरमध्ये स्वतंत्र वाट चोखाळण्याचा तयारीत


वृत्तसंस्था

पाटणा : बिहारमधील सत्ताधारी पक्ष संयुक्त जनता दल अर्थात जेडीयू उत्तर प्रदेश आणि मणिपूरमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा बेतात आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लल्लन सिंग यांनी हे स्पष्ट केले आहे.Nitish Kumar’s JDU is preparing for an independent path in Uttar Pradesh, Manipur

उत्तर प्रदेश आणि मणिपूरमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएमधून जेडीयूची निवडणूक लढविण्याची तयारी आहे. भाजपने आम्हाला एनडीएच्या घटक पक्ष म्हणून उत्तर प्रदेश आणि मणिपूरमध्ये काही जागा सोडल्या तर विधानसभा निवडणुका आम्ही त्यांच्याबरोबर लढवू अन्यथा आम्हाला आमचा मार्ग मोकळा आहे, असा इशारा लल्लन सिंह यांनी दिला आहे.



बिहारमध्ये नितीशकुमार यांचा पक्ष छोटा असून देखील भाजपने त्यांना मुख्यमंत्रीपद दिले. परंतु त्यांनी गेल्या महिनाभरापासून ओबीसी जनगणना तसेच उत्तर प्रदेश आणि मणिपूरमधील निवडणूक या मुद्द्यांवरून भाजपपासून अलग राहण्याची भूमिका घेतलेली दिसत आहे.

परंतु राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्ष म्हणून आपण बाजूला झालेलो नाही हेही त्यांना दाखवायचे असल्यामुळे त्यांनी आपले राष्ट्रीय अध्यक्ष लल्लन सिंग यांच्याकरवी भाजप नेत्यांना जेडीयू स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्यास तयार असल्याचा इशारा देऊन ठेवला आहे.

उत्तर प्रदेशात जेडीयूचे फारसे स्वतंत्र अस्तित्व नाही तरी देखील भाजप नेत्यांना विधानसभेसाठी काही जागा सोडण्याची अपेक्षा आहे. त्यामुळेच जेङीयू आता अन्य राज्यांमध्ये संघटन वाढवू इच्छिते,असे विधान लल्लन सिंह यांनी केले आहे.

Nitish Kumar’s JDU is preparing for an independent path in Uttar Pradesh, Manipur

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात