विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : टाटा उद्योगसमुहाचे अध्यक्ष रतन टाटा यांचा दानशुरपणा प्रसिध्द आहे. त्यांना भाररत्न पुरस्कार द्यावा अशीही मागणी केली जाते. मात्र, जागतिक पातळीवरील पहिल्या १०० दानशूर उद्योगपतींमध्ये त्यांचा समावेश नाही. या यादीत नीता अंबानी, गौतम अदानी, कुमारमंगलम बिर्ला यांचा समावेश आहे. Nita Ambani, Gautam Adani and Kumar Mangalam Birla are among the 100 most generous industrialists in the world.
अमेरिकास्थित इंडियासपोरा या संस्थेने जारी केलेल्या जगभरातील दानशूर १०० भारतीय उद्योगपतींच्या यादीत अदानी समूहाचे सीईओ गौतम अदानी, रिलायन्स फाउंडेशनच्या चेअरपर्सन तथा संस्थापक नीता अंबानी आणि आदित्य बिर्ला समूहाचे प्रमुख कुमारमंगलम बिर्ला यांचा समावेश झाला आहे. नऊ सदस्यीय पथकाने अभ्यासांच्या आधारे ही यादी तयार केली आहे.
या यादीतील इतर नावांत अमेरिकेतील माँटे अहुजा, अजय बंगा, मनोज भार्गव, कॅनडातील सोनम अजमेरा, बॉब धिल्लन व आदित्य झा, ब्रिटनमधील मोहंमद अमेर्सी, मनोज बंडाळे आणि कुजिंदर बहिया यांचा समावेश आहे. याशिवाय यूएई, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया येथील दानशूर भारतीयांची नावेही यादीत आहेत. या उद्योगपतींनी आरोग्य, पाणीपुरवठा व स्वच्छता, कला व संस्कृती, मूल्यशिक्षण, रोजगारक्षमता आणि अन्न असुरक्षा या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात देणग्या दिल्या आहेत.
रतन टाटा यांनी वैयक्तिक स्वरुपात देणग्या दिल्या नाहीत. टाटा उद्योगसमूह म्हणून देणग्या दिल्याने त्यांचे नाव या यादीत नाही असे बोलले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App