दुबईतून सोने तस्करी करण्याचे स्वप्ना सुरेशचे कृत्य दहशतवादी स्वरुपाचेच, एनआयएचा दावा


विशेष प्रतिनिधी

कोची : दुबईतून भारतात १६७ किलो सोने तस्करी करून आणण्याचे स्वप्ना सुरेश आणि इतरांचे कृत्य दहशतवादी स्वरुपाचे आहे. आपल्या कृत्याने देशाच्या सुरक्षेला आणि आर्थिक स्थैर्याला धोका निर्माण होईल, हे माहिती असूनही त्यांनी हे कृत्य केले, असा युक्तीवाद एनआयएने केरळ उच्च न्यायालयात केला.NIA opposes sawpans bail plea

हे दहशतवादी कृत्य करण्यासाठी सर्व आरोपींनी एकत्र येत काही लोकांना भरती करून घेत दहशतवादी गट स्थापन केला, निधी गोळा केला आणि नोव्हेंबर २०१९ ते जून २०२० या कालावधीत ‘युएई’हून जवळपास १६७ किलो सोन्याची तस्करी केली.



त्यांनी तिरुअनंतपुरम येथील वाणिज्यदूतांच्या कार्यालयाच्या पत्त्यावर पार्सल मागवत ही तस्करी केली, असेही ‘एनआयए’ने सांगितले.स्वप्ना सुरेश हिने जामीनासाठी अर्ज केला असून त्याविरोधात ‘एनआयए’ने आज युक्तीवाद केला. ‘स्वप्ना सुरेश आणि इतरांनी राजनैतिक मार्गाने सोन्याची तस्करी केली.

या कृतीमुळे भारत अणि संयुक्त अरब अमिरातीमधील संबंध बिघडण्याची शक्यता असूनही त्यांनी जाणीवपूर्वक हा गुन्हा केला असून त्याची दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत नोंद करता येऊ शकते,’ असे ‘एनआयए’ने न्यायालयात सांगितले.

NIA opposes sawpans bail plea

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात