NFHS-5 Sex Ratio Data : भारतात पहिल्यांदाच पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त ! आता खेड्यात १००० पुरुषांमागे १०३७ महिला


  • NFHS चे पाचवे सर्वेक्षण २०१९-२०२० मध्ये करण्यात आले आहे.
  • आता खेड्यातील हजार पुरुषांमागे १०३७ महिला

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्लीःदेशात प्रथमच पुरुषांच्या तुलनेत महिलांची लोकसंख्या वाढली आहे. आता दर १००० पुरुषांमागे १०२० महिला आहेत. स्वातंत्र्यानंतर पुरुषांच्या तुलनेत महिलांची लोकसंख्या १ हजारांहून अधिक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 (NFHS-5) मध्ये ही आकडेवारी समोर आली आहे. यापूर्वी २०१५-१६ मध्ये आयोजित केलेल्या NFHS-4 मध्ये, ही संख्या दर १००० पुरुषांमागे ९९१ महिला होत्या.NFHS-5 Sex Ratio Data: For the first time in India, women outnumber men! Now there are 1037 women for every 1000 men in the village

भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये, पहिल्यांदाच पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त नोंदवली गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या अहवालानुसार भारतात दर १००० पुरुषांमागे १०२० महिला आहेत. एवढेच नाही तर जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तरही सुधारले आहे. २०१५-१६ मध्ये, १००० मुलांमागे ९१९ मुली होत्या, ज्यात २०१९-२०२० मध्ये १००० मुलांमागे ९२९ मुली झाल्या आहेत.



गावात लिंग गुणोत्तर वाढले

NFHS-5 डेटामध्ये हे देखील समोर आले आहे की लिंग गुणोत्तरातील सुधारणा शहरांपेक्षा खेड्यांमध्ये चांगली झाली आहे. खेड्यांमध्ये दर 1,000 पुरुषांमागे 1,037 महिला आहेत, तर शहरांमध्ये 985 महिला आहेत. NFHS-4 मध्येही हीच बाब समोर आली आहे. त्या सर्वेक्षणानुसार, खेड्यांमध्ये 1,000 पुरुषांमागे 1,009 महिला आणि शहरांमध्ये 956 महिला होत्या.

१९९० मध्ये नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांनी “मिसिंग वूमन” हा शब्दप्रयोग केला होता, कारण महिला लोकसंख्या देशात कमी होती. तेव्हा भारतात १००० पुरुषांमागे फक्त ९२७ महिला असं प्रमाण होत.

मात्र, आता भारतात महिलांच्या संख्येत सुधारणा होत आहे ही देशासाठी चांगली बाब आहे. या सर्वेक्षणात बाल आरोग्य, कुटुंब कल्याण, पोषण इत्यादी निर्देशकांचे एकत्रितपणे गणना केली जाते.

NFHS चं सर्वेक्षण एक ‘सैंपल सर्वे’ म्हणून मानला जातो. ही संख्या पुर्ण भारताच्या लोकसंख्येला किती लागू होते, हे पुढील राष्ट्रीय जनगणनेत कळेल. मात्र, ही संख्या कमी-अधिक प्रमाणात समान असणे अपेक्षित आहे.

कोणत्याही NFHS किंवा जनगणनेत ही पहिलीच वेळ होती की महिला लोकसंख्येचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे.

23 राज्यांमध्ये 1000 पुरुषांमागे महिलांची लोकसंख्या 1000 पेक्षा जास्त आहे.  देशात 23 राज्ये अशी आहेत की जिथे दर 1000 पुरुषांमागे महिलांची लोकसंख्या 1000 पेक्षा जास्त आहे. उत्तर प्रदेशात दर हजार पुरुषांमागे 1017 महिला, बिहारमध्ये 1090, दिल्लीत 913, मध्य प्रदेशात 970, राजस्थानमध्ये 1009, छत्तीसगडमध्ये 1015, महाराष्ट्रात 966, पंजाबमध्ये 938, हरियाणामध्ये 926, झारखंडमध्ये 1050 महिला आहेत.

NFHS चे पाचवे सर्वेक्षण 2019-20 मध्ये करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात पहिला पुर्ण देशात, बाल आरोग्य, कुटुंब कल्याण, पोषण इत्यादी निर्देशकांचे एकत्रितपणे गणना केली गेला. तसेच 14 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्वेक्षण केले गेले.

या टप्प्यात अरुणाचल प्रदेश, चंदीगड, छत्तीसगड, हरियाणा, झारखंड, मध्य प्रदेश, एनसीटी दिल्ली, ओडिशा, पुद्दुचेरी, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड ही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे सर्वेक्षण करण्यात आले, असे आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

NFHS-5 Sex Ratio Data: For the first time in India, women outnumber men! Now there are 1037 women for every 1000 men in the village

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात