6G NETWORK : Good News ; भारताकडे पुढील 2 वर्षात स्वत:चं 6G नेटवर्क ; दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला संपूर्ण प्लॅन तयार


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात 6G टेक्नोलॉजीची तयारी सुरू झाली आहे. दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, भारत स्वदेशी विकसित 6G टेक्नोलॉजीवर काम करत आहे. 2023 च्या अखेरीस किंवा 2024 च्या सुरूवातीला म्हणजेच 2 वर्षांत भारतात 6G टेक्नोलॉजी लॉन्च करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. या टेक्नोलॉजीवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञ आणि इंजीनिअर्सना आवश्यक परवानग्या देण्यात आल्या आहेत. 6G NETWORK: Good News; India to have its own 6G network in next 2 years; Telecom Minister Ashwini Vaishnav prepared the entire planदूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, “आम्ही भारतात असे टेलिकॉम सॉफ्टवेअर डिझाइन करत आहोत, जे भारतात बनावलेले टेलिकॉम डिव्हाईस, भारतात टेलिकॉम नेटवर्कची सेवा देईल. पुढील वर्षाच्या तिमाहीपर्यंत तंत्रज्ञानासाठी महत्त्वाचे सॉफ्टवेअरही तयार होईल. 5G स्पेक्ट्रमचा लिलाव देखील कॅलेंडर वर्ष 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत होण्याची शक्यता आहे.”

5G स्पेक्ट्रमचा लिलाव

5G स्पेक्ट्रमचा लिलाव देखील कॅलेंडर वर्ष 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत होण्याची शक्यता आहे. 5G स्पेक्ट्रमच्या लिलावासाठी ट्रायकडे संदर्भ देण्यात आला आहे. त्यांनी सल्लामसलत सुरू केली आहे.

ही प्रक्रिया येत्या वर्षभरात फेब्रुवारी-मार्च कालावधीत कुठेतरी संपेल अशी अपेक्षा आहे. येत्या वर्षाच्या सुरुवातीला, दूरसंचार कंपन्यांच्या अल्पकालीन तरलतेच्या गरजा तसेच दीर्घकालीन समस्यांना सामोरे जाण्यासाठी नऊ सुधारणांचा संच मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार लवकरात लवकर या प्रोजेक्टवर काम पूर्ण होईल अशी आशा व्यक्तं केली जात आहे.

6G NETWORK : Good News; India to have its own 6G network in next 2 years; Telecom Minister Ashwini Vaishnav prepared the entire plan

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण