भारताने जीएसटी संकलनाचा एक नवा उच्चांक गाठला आहे. एप्रिल 2022 मध्ये सुमारे 1 लाख 67 हजार 540 कोटींचा जीएसटी गोळा झाला. मार्च महिन्यात 1,42,092 कोटींचे जीएसटी संकलन झाले होते.New high of GST collection, 1 lakh 67 thousand crore GST revenue in April
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताने जीएसटी संकलनाचा एक नवा उच्चांक गाठला आहे. एप्रिल 2022 मध्ये सुमारे 1 लाख 67 हजार 540 कोटींचा जीएसटी गोळा झाला. मार्च महिन्यात 1,42,092 कोटींचे जीएसटी संकलन झाले होते.
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात 1,39,708 कोटी जीएसटी गोळा झाला होता. म्हणजे, वार्षिक आधारावर जीएसटी संकलनात तब्बल 20 टक्क्यांची वाढ झाली आहे.जीएसटी संकलन 1.5 लाख कोटींहून अधिक गोळा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी मार्च महिन्यात 1,42,095 कोटी जीएसटी गोळा झाला होता.
ऑक्टोबरमधील जीएसटी संकलनाच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या पाच राज्यांमध्ये आहे. एप्रिल 2022 मध्ये महाराष्ट्रातील जीएसटी संकलन गेल्या वर्षीच्या तुलनेत 35 टक्के वाढून 27 हजार 495 कोटींवर पोहोचले. हा आकडा गेल्या वर्षीच्या 22 हजार 13 कोटी रुपयांहून कितीतरी मोठा आहे.
या यादीत कर्नाटक व गुजरात अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. जीएसटी संकलनात महाराष्ट्रात 25 टक्के, कर्नाटकात 19 टक्के, गुजरातमध्ये 17 टक्के, तामीळनाडूत 10 टक्के, उत्तर प्रदेशात 16 टक्के वाढ झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App