नौदलाची ताकद वाढणार, जमीवरून मारा करून विमाने पाडू शकणाऱ्या मिसाईलची चाचणी यशस्वी


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार असून डीआरडीओने जमिनीवरून हवेत मारा करू शकणाऱ्या कमी अंतराच्या मिसाईची यशस्वी चाचणी घेतली. ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावरून काही अंतरावरील चांदीपूरच्या लक्ष्याला अचूक भेदण्यात आले.Naval Strength Will Be Increased, Successful Test of Missile

मिसाईल व्हर्टिकल लाँचरद्वारे कमी पल्ल्याच्या पृष्ठभागावरून लाँच करण्यात आले होते. मिसाईलने लक्ष्य भेदले. हे मिसाईल भारतीय नौदलासाठी तयार करण्यात आले आहे. मंगळवारी डीआरडीओने नौदल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही चाचणी केली. या मिसाईलची पहिली चाचणी 22 फेब्रुवारीला घेण्यात आली होती.संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ आणि नौदलाचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, हे मिसाईल हवाई हल्यांविरोधात भारतीय नौदलाची ताकद वाढविणार आहे. या मिसाईलची रेंज 50 ते 60 किमी आहे. तसेच हे मिसाईल जमिनीवरून हवेत मारा करू शकते.

म्हणजेच हवेतून येणारे विमान किंवा मिसाईल ते क्षणात उध्व्स्त करू शकते. हे मिसाईल नौदलाच्या युद्धनौकांवर तैनात केले जाईल. या मिसाईलच्या चाचणीसाठी बालासोर जिल्हा प्रशासनाने संरक्षणासाठी 2.5 किमीच्या परिघात राहणाºया 4 हजार लोकांना तात्पुरते सुरक्षित स्थळी हलविले होते.

Naval Strength Will Be Increased, Successful Test of Missile

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती