नाशिकमध्ये २१ ऑक्टोबरच्या छाप्यांमध्ये १०० कोटींची बेहिशेबी संपत्ती मिळालीय, तपास अजूनही सुरू; केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा खुलासा


वृत्तसंस्था

नवी दिल्ली – नाशिकमध्ये एका कथित लँड डीलरवर २१ ऑक्टोबरला टाकलेल्या छाप्यामध्ये आतापर्यंत १०० कोटींची बेहिशेबी संपत्ती आढळून आली आहे. तपास अजून पुढे सुरू आहे, असा खुलासा केंद्रीय अर्थ मंत्रालयाने केला आहे.Nashik raids on October 21, unaccounted assets worth Rs 100 crore were found, investigation is still going on; Union Finance Ministry reveals

प्राप्तिकर खात्याने २१ ऑक्टोबरला नाशिकमध्ये रिअल इस्टेटशी आणि जमीन व्यवहारांशी संबंधित व्यक्तीवर कारवाई करून छापे घातले होते. त्यावेळी काही रोख रक्कम आणि कागदपत्रे या छाप्यात जप्त करण्यात आली होती.



त्याचा तपास केला असता आतापर्यंत १०० कोटींची बेहिशेबी संपत्ती आढळून आली आहे. अजून पुढे तपास सुरू ठेवावा लागणार आहे, असे अर्थ मंत्रालयाने आपल्या खुलाशात नमूद केले आहे.
या आधी प्राप्तिकर खात्याने पुणे, बारामती, कोल्हापूर, सातारा, जयपूर आदी ७० शहरांमध्ये घातलेल्या छाप्यांमध्ये एकूण १८४ कोटी रूपयांची बेहिशेबी संपत्ती आढळून आली होती.

याचा खुलासा प्राप्तिकर खात्याने अधिकृत पत्रक प्रसिध्दीला देऊन केला होता.असाच खुलासा नाशिकमधल्या छाप्यांबद्दल केंद्रीय अर्थ मंत्रालयाने केला आहे. नाशिकमधल्या छाप्यांमध्ये आतापर्यंत १०० कोटींची बेहिशेबी संपत्ती आढळून आल्याचा हा खुलासा आहे.

Nashik raids on October 21, unaccounted assets worth Rs 100 crore were found, investigation is still going on; Union Finance Ministry reveals

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात