गुजरात निवडणूक 2022 : नरेंद्रांचे रेकॉर्ड तर भूपेंद्रांनी तोडलेच; पण माधव सिंहांचेही रेकॉर्ड तुटले; पण ते कसे??


विशेष प्रतिनिधी

अहमदाबाद : गुजरात विधानसभा 2022 च्या निवडणुकीत भाजपनेची घोषणा दिली होती, नरेंद्र का रेकॉर्ड भूपेंद्र तोडेगा… हे रेकॉर्ड तर तुटलेच म्हणजे भाजपने 127 जागांचा आकडा ओलांडलाच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे भाजपने काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री माधव सिंह सोळंकी यांचे 1985 चा रेकॉर्ड देखील तोडल्याचे दिसत आहे. Narendra’s record was broken by Bhupendra; But even Madhav Singh’s record was broken

1985 च्या इंदिरा सहानुभूतीच्या लाटेत पंतप्रधान राजीव गांधींनी जसे लोकसभेत 415 जागांचे प्रचंड बहुमत मिळाले होते, तसेच रेकॉर्ड मुख्यमंत्री माधवसिंह सोळंके यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने गुजरात विधानसभेत केले होते. काँग्रेसने त्या निवडणुकीत 149 जागा जिंकल्या होत्या आणि त्याचे सगळे श्रेय माधव सिंह सोळंकी यांनी गुजरातमध्ये बसविलेल्या “खाम” KHAM म्हणजे क्षत्रिय, हरिजन, आदिवासी, मुसलमान या राजकीय समीकरणात होते. म्हणजे निदान असे मानले गेले होते. आणि काँग्रेसनेही ते स्वीकारले होते. पण हे रेकॉर्ड 2022 मध्ये तुटताना नेमके कोणते समीकरण भाजपने बसवले?, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.

काँग्रेसचे नेते अर्थातच आपल्या सर्वात मोठ्या अपयशाचे खापर आम आदमी पार्टीवर आणि असदुद्दीन ओवैसी यांच्यावर फोडत आहेत. आम आदमी पार्टी आणि ओवैसी यांनी काँग्रेसची मते फोडल्यामुळे भाजपचा फायदा झाला असे त्रैराशिक काँग्रेसचे नेते मांडत आहेत. पण मुळातच ज्या KHAM म्हणजेच हिंदू मतांच्या एकजूटीवर अथवा फुटीवर काँग्रेस अवलंबून होती ते KHAM समीकरण भाजपने मतांच्या टक्केवारीत देखील तोडले आहे, हे काँग्रेसचे नेते मान्य करायला तयार नाहीत. काँग्रेसच्या KHAM  या राजकीय समीकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या हिंदुत्वाच्या राजकीय समीकरणे मात केल्याचे दिसत आहे.

किंबहुना भाजपने इथे बाकी कोणत्याही पक्षांविरुद्ध निवडणूक लढवण्यापेक्षा स्वतःचे रेकॉर्ड तोडण्यासाठी निवडणूक लढवली आणि सगळे डावपेच आखले. यामध्ये अँटी इन्कमबन्सीचा तोटा टाळण्यासाठी 41 उमेदवारांची आमदारांची तिकिटे कापली. बाहेरून भाजपमध्ये आलेल्या 7 उमेदवारांना तिकीटे दिली, वगैरे सर्व बाबी आल्या आहेत. पण भाजपची खरी रेस रेस अगेन्स इट्सेल्फ अशी होती. म्हणजे भाजप स्वतःचेच रेकॉर्ड तोडण्यासाठी निवडणुकीत उतरला होता. आणि संघटनेच्या बळावर, नरेंद्र मोदींच्या करिश्मावर पक्षाने माधव सिंह सोळंकी यांचे रेकॉर्डिंग तोडण्यात यश मिळवले दिसते.

भाजपची घोषणा प्रत्यक्षात माधव सिंह का रेकॉर्ड भूपेंद्र तोडेगा अशी नव्हती. ती घोषणा नरेंद्र का रेकॉर्ड भूपेंद्र तोडेगा, अशीच होती. पण निवडणुकीच्या रिंगणात मात्र उतरताना भाजपची राजकीय स्ट्रॅटेजी नरेंद्र का रेकॉर्ड तो भूपेंद्र तोडेगाही लेकिन माधव सिंह का रेकॉर्ड भी तोडेगा अशीच राहिलेली दिसून आली आहे. यामध्ये व्यक्तिगत महिमामंडनापेक्षा भाजपची 2024 साठीची निवडणूक पूर्ण यशस्वी करण्याची खरी चाल होती आणि त्यात 2022 च्या डिसेंबरमध्ये पक्ष यशस्वी झाल्याचे दिसत आहे.

Narendra’s record was broken by Bhupendra; But even Madhav Singh’s record was broken

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण