नारायण राणे MSME मंत्री, मनसुख मांडविया – आरोग्यमंत्री, धर्मेंद्र प्रधान – शिक्षणमंत्री, ज्योतिरादित्य शिंदे – नागरी हवाई वाहतूकमंत्री तर अनुराग ठाकूर माहिती प्रसारण मंत्री

वृत्तसंस्था

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या फेरबदलात नारायण राणे यांच्याकडे MSME अर्थात मध्यम, लघू आणि सुक्ष्म उद्योग मंत्रालयाचा कारभार सोपविण्यात आला आहे. हे खाते आधी नितीन गडकरींकडे होते. मनसुख मांडवीय यांच्याकडे देशाच्या आरोग्य मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर आधीचे पेट्रोलिमयमंत्री धर्मेंद्र प्रधान हे नवे शिक्षणमंत्री आणि कौशल्यविकास मंत्री असतील.

त्यासोबतच नव्याने तयार करण्यात आलेल्या केंद्रीय सहकार विभागाची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. अमित शाह यांच्याकडे सहकार विभागाचा अतिरिक्त भार असणार आहे. त्यासोबतच इतरही महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी नव्याने शपथ ग्रहण केलेल्या मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे.

कुणाकडे कोणतं खातं…

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी – विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय (अतिरिक्त भार)
  • मनसुख मांडवीय – आरोग्य मंत्री, रसायन मंत्री
  • अमित शाह – सहकार मंत्री (अतिरिक्त भार)
  • ज्योतिरादित्य सिंदिया – हवाई वाहतूक मंत्री
  • अनुराग ठाकूर – माहिती व प्रसारण मंत्री, युथ अफेअर्स
  • सर्वानंद सोनोवाल – आयुष मंत्रालय
  • भूपेंद्र यादव – कामगार, पर्यावरण – हवामान बदल मंत्री

महत्त्वाच्या बातम्या