राज्यसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतून दगाफटका होण्याच्या भीतीतून नाना – थोरात फडणवीसांकडे!!

प्रतिनिधी

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतूनच काँग्रेसच्या उमेदवार रजनी पाटील यांना दगाफटका होण्याची भीती वाटल्याने काँग्रेसचे नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची यांच्या सागर या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. राज्यसभा निवडणूक बिनविरोध करावी,Nana-Thorat to Fadnavis for fear of being slapped by Mahavikas Aghadi in Rajya Sabha by-election !!

अशी थोरात आणि नानांनी फडणवीसांना गळ घातली. भाजपच्या कोअर कमिटीत या बद्दल चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्‍वासन फडणवीस यांनी बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांना दिले.काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेची पोटनिवडणूक घ्यावी लागते आहे. यामध्ये काँग्रेसने रजनी पाटील यांना उमेदवारी दिली आहे. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीतही त्यांचे नाव होते. परंतु अजून त्यांच्या नियुक्त्या होईनात म्हणून रजनी पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आल्याचे सांगण्यात येते.

परंतु त्यांच्या उमेदवारीमुळे राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी आणखी रखडण्याची शक्यता आहे. कारण त्यात बदल करावे लागतील. त्याला वेळ लागेल. यामुळे शरद पवार काँग्रेसच्या या राजकीय खेळीवर नाराज असल्याचे बोलले जाते.

आधी नाना पटोले यांना काँग्रेसने विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला लावून प्रदेशाध्यक्ष केले. आजही विधानसभेचे अध्यक्षपद संख्याबळाच्या धास्तीने शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना रिकामी ठेवावे लागत आहे.

त्यात आता रजनी पाटलांच्या उमेदवारीमुळे शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हवे असलेले 12 आमदार विधान परिषदेवर नियुक्त होऊ शकत नाहीत. त्यामुळे काँग्रेसच्या एकूण राजकीय खेळीवर पवार आणि ठाकरे दोघेही नाराज असल्याचे समजते. या सगळ्या नाराजीचा वचपा राज्यसभा निवडणुकीत निघू शकतो आणि काँग्रेसच्या उमेदवार रजनी पाटील यांना पराभव पत्करावा लागतो शकतो, अशी भीती काँग्रेस नेत्यांना वाटत आहे. त्यामुळेच त्यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिलेली आहे. भाजपकडे फक्त 20 मते कमी आहेत. त्याची बेगमी आम्ही करू, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी कालच सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक इंटरेस्टिंग राजकीय मोडवर आहे.

Nana-Thorat to Fadnavis for fear of being slapped by Mahavikas Aghadi in Rajya Sabha by-election !!

महत्त्वाच्या बातम्या