विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आहे. काँग्रेसने याबद्दल मागणी लावून धरली होती. पण, अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधील एका मंत्र्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे एका मंत्र्याची विकेट पडणार आहे, असे सूचक विधान विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.Nana Patole, state president, hinted that a Congress minister would lose his wicket
नागपूर विधान परिषद निवडणुकीत पराभवामुळे काँग्रेस हायकमांडने नाना पटोले, नितीन राऊत आणि सुनील केदार यांना समन्स बजावला होता. दिल्लीत तिन्ही नेत्यांनी हायकमांडसोबत चर्चा केली. या बैठकीनंतर नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला.
नागपूर विधान परिषद निवडणुकीत पराभवाबाबत चर्चा झाली. त्याशिवाय राज्यातील पक्षबांधणी आणि संघटनात्मकाबद्दल महत्त्वाची चर्चा झाली. हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे या हिवाळी अधिवेशनामध्ये अध्यक्षाची निवड केली जाईल. काँग्रेसची आधीपासून आग्रहाची मागणी राहणार आहे.
२६ ते २७ पर्यंत अध्यक्षपदाची निवड केली जावी, अशी आमची भूमिका आहे. याबद्दल हायकमांडसोबत चर्चा झाली. मला वाटत अधिवेशनामध्ये अध्यक्षाची निवड होईल’ असं नाना पटोले म्हणाले.
अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी काँग्रेसमधून कोणत्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागणार आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता पटोले म्हणाले की, ‘हा निर्णय हायकमांडचा आहे. कुणाची निवड करायची आहे, त्याबद्दलचा निर्णय हायकमांड घेत असते.
अध्यक्षापदाबद्दल अद्याप कोणत्याही नावाची चर्चा झाली नाही. ज्या दिवशी निवडणुकीचे माहिती समोर येईल, तेव्हा हायकमांडकडून निर्णय घेतला जाईल.’नितीन राऊत आणि सुनील केदार कोणतीही प्रतिक्रिया न देता निघून गेले होते.
याबद्दल विचारले असता नाना पटोले म्हणाले की, ‘प्रदेशाध्यक्ष म्हणून मी हजर होतो. पक्ष संघटनात्मक बैठक असल्यामुळे मी बोलणार होतो, त्यामुळे ते निघून गेले असावे’, असं पटोले म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App