मुस्लिम कलाकाराला धमकी! रामलीलामध्ये श्री रामाचा रोल करण्यावरून झाला वाद


विशेष प्रतिनिधी

बरेली : बरेली मधील दानिश ह्या मुस्लिम कलाकाराला एका मुस्लिम मुलाकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ह्याचे कारण असे की, रामलीलामध्ये भगवान श्री रामची भूमिका दानिश मागील काही वर्षांपासून साकारत आहे. ह्या वर्षी देखील त्याने ही भूमिका साकारली तर त्याला जीवे मारले जाईल अशी धमकी त्याला मिळाली आहे.

Muslim artist got death threats for playing the role of lord ram in ramleela

30 वर्षीय दानिशने वरिष्ठ पोलीस अधीक्षक रोहितसिंग सजवान यांना ह्या संबधी तक्रार केली आहे. ज्याने त्याला धमकी दिली तो त्याचा पूर्वी भाडेकरू आहे असेही त्याने सांगितले आहे.

दानिश म्हणाला की, त्याच्या भाडेकरूने त्याला दोन महिन्यांचे भाडे देणे बाकी आहे. ते भाडे त्याने भरले नाही आणि म्हणूनच कदाचित तो भाडे देणे टाळण्यासाठी हा मुद्दा उपस्थित करत आहे. दरवर्षी प्रमाणे मी रामलीलाची तयारी करत होतो तेव्हा हा भाडेकरू त्यांच्या सहकाऱ्यासोबत आला आणि जर हिंदू देवतेची भूमिका बजावली तर आम्ही बहिष्कार टाकू आणि नंतर जिवंत मारून टाकू अशी धमकी दिली.


Hindu – Muslim DNA; द्ग्विजयसिंगांनी उकरून काढला धर्मांतरविरोधी, लव जिहादविरोधी कायद्याचा मुद्दा


भाडेकरू आणि त्याच्या सहकाऱ्याने त्याच्यावर चाकूने हल्ला देखील केला पण दानिशच्या चुलत भावाने हस्तक्षेप केल्याने मोठी दुखापत झाली नाही.

“ही भाडेकरू मधील आपापसातील वादाची गोष्ट आहे आणि त्या भाडेकरूचे वर्तन आणि हेतू नक्कीच चुकीचे आहेत असे चुकीचे पोलिस एसएसपी सजवान यांनी सांगितले आहे. पोलिस निरीक्षकांनी दानिशच्या सुरक्षेत वाढ केली आहे तसेच सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दानिशने वृत्तसंस्था पीटीआय सोबत बोलताना म्हटले, ‘मी एक कलाकार आहे आणि मी सर्व धर्मांचा समान आदर करतो.’

Muslim artist got death threats for playing the role of lord ram in ramleela

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात