मुंबै बँकेची बदनामी; नवाब मलिक, दै. लोकसत्ता आणि वृत्तवाहिनी लोकशाही विरुध्द तीन हजार कोटी रुपयांचे दावे


मुंबई उच्च न्यायालयात प्रत्येकी १ हजार कोटी रुपयांचे अब्रुनुकसानीचा दावे दाखल


प्रतिनिधी

मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राज्यातील प्रगत आणि उत्तम बँक आहे. कारण मुंबै बँक १२०० कोटींच्या टप्प्यावरून दहा हजार कोटीवर आली आहे. मुंबै बँकेच्या लौकिकास काळीमा फासण्याचे काम दुदैर्वाने काही जणांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबै बँकेच्या संदर्भात कोणीही उठसूट वाटेल ते विधाने करतील व बदनामीकारक बातम्या प्रसिध्द करतील हे अयोग्य असल्यामुळे बँकेने कालच मुंबई उच्च न्यायालयात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि वृत्तपत्र दै. लोकसत्ता आणि वृत्त वाहिनी लोकशाही या तिघांविरुध्द प्रत्येकी एक हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केल्याची माहिती मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सरव्यवस्थापक देवदास कदम यांनी आज दिली.Mumbai Bank’s notoriet Nawab Malik

प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना देवदास कदम यांनी सांगितले की, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेला इथपर्यंत आणण्यात अनेक सभासद, ठेवीदार, आजी- माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, कर्मचारी आदींचे योगदान आहे. मुंबै बँक ही मुंबईच्या सहकाराचे वैभव आहे. पण बँकेला काळिमा फासण्याचे काम सर्व टप्प्यावर होत आहे. एका आर्थिक संस्थेची बदनामी झाल्याचा परिणाम त्यांचे ग्राहक, डिपॉझिटर्स यांच्यावर होतो. या बँकेवर लाखो लोकांचे पोट अवलंबून आहे.

एखाद्या बातमीने किंवा एखाद्या स्टेटमेंटने बँक अडचणीत आली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? म्हणून आम्ही मुंबै बँकेच्या बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात सूट नंबर (एल) २१९०९ ऑफ २०२१ – (द इंडियन एक्सप्रेस (प्रा.) लिमिटेड अँण्ड अदर्स) आणि सूट नंबर (एल) २१९३५ ऑफ २०२१ – (नवाब मलिक अँण्ड अदर्स) या नोंदणी क्रमांकप्रमाणे अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. वृत्त वाहिनी लोकशाहीच्या विरोधात उच्च न्यायालयात आजच अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. मुंबै बॅंकेची नाहक बदनामी करणा-यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी आम्ही न्यायालयात केल्याची माहिती देवदास कदम यांनी यावेळी दिली. तसेच अब्रुनुकसानीच्या दाव्यानंतर आता बँकेच्या वतीने फौजदारी दावा दाखल करीत आहोत असे त्यांनी स्पष्ट केले.

– बदनामी करण्यांच्या विरोधात कारवाई करण्याचा ठराव समंत

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. या सभेमध्ये मुंबै बँकेच्या होणा-या बदनामी संदर्भात सभासदांनी चिंता व्यक्त केली. मुंबै जिल्हा बँकेची बदनामी करणा-या संबंधितांच्या विरोधात कारवाई करण्याचा ठराव वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमुखाने समंत करण्यात आल्याची माहिती बँकेचे सरव्यवस्थापक कदम यांनी दिली.

Mumbai Bank’s notoriet Nawab Malik

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात