MS Dhoni Twitter : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या ट्विटर हँडलवरून ब्लू टिक काढून टाकण्यात आले आहे. धोनी ट्विटरवर कमी सक्रिय असल्यामुळे ट्विटरने असे केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यामुळेच ट्विटरने त्याच्या अकाऊंटमधून ब्लू टिक काढून टाकली आहे. धोनीचे ट्विटरवर सुमारे 8.2 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. MS Dhoni Twitter Removed blue tick from Captain Cool MS Dhoni account
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या ट्विटर हँडलवरून ब्लू टिक काढून टाकण्यात आले आहे. धोनी ट्विटरवर कमी सक्रिय असल्यामुळे ट्विटरने असे केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यामुळेच ट्विटरने त्याच्या अकाऊंटमधून ब्लू टिक काढून टाकली आहे. धोनीचे ट्विटरवर सुमारे 8.2 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
एमएस धोनीने यावर्षी 8 जानेवारी रोजी अखेरचे ट्विट केले होते. त्यानंतर त्याने ट्विट केलेले नाही. मात्र, तो इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह राहतो. त्याच वेळी 8 जानेवारीपूर्वी त्याने सप्टेंबर 2020 मध्ये ट्विट केले होते. यामुळे असे मानले जात आहे की, फारसा सक्रिय नसल्यामुळे ट्विटरने एमएस धोनीची ब्ल्यू टिक काढून टाकली आहे. पण यामुळे त्याच्या चाहत्यांना नक्कीच धक्का बसला आहे.
एमएस धोनीची गणना जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा धोनी जगातील एकमेव कर्णधार आहे. त्याने 2007 मध्ये टी -20 विश्वचषक, 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. धोनीचा हा विक्रम मोडणे जवळजवळ अशक्य आहे.
डिसेंबर 2004 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवणाऱ्या धोनीच्या 90 कसोटीत 38.09 च्या सरासरीने 4876 धावा आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एक द्विशतक, सहा शतके आणि 33 अर्धशतके आहेत. याशिवाय माहीने 350 एकदिवसीय सामन्यांमध्ये 50.58 च्या सरासरीने 10773 धावा केल्या आहेत. धोनीच्या नावावर 10 शतके आणि 73 अर्धशतके आहेत. तसेच 98 टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये माहीने 40.25 च्या सरासरीने 4669 धावा केल्या आहेत.
MS Dhoni Twitter Removed blue tick from Captain Cool MS Dhoni account
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App