विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्याची ईडीने पाच तास चौकशी केल्याने सासू जया बच्चन चांगल्याच भडकल्या आहेत. तुमचे वाट्टोळं होईल असा शाप जया बच्चन यांनी मोदी सरकारला दिला आहे.Mother-in-law gets angry over daughter in laws ED inquiry, Jaya Bachchan curses Modi government
पनामा पेपर्स प्रकरणी ऐश्वर्या रायची तब्बल ५ तास ईडीनं चौकशी केली. मात्र, मुंबईकडे या प्रकरणामुळे वातावरण तापलं असताना राजधानी दिल्लीत राज्यसभेत जया बच्चन चांगल्याच संतापल्या. जया बच्चन यांच्या थयथयाटामुळे राज्यसभेच्या सभापतींना सभागृह काही काळ तहकूब करावं लागलं.
राज्यसभेमध्ये ड्रग्जविरोधी विधेयकासंदर्भात चर्चा सुरू असताना समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांचा पारा चांगलाच चढला. विधेयकाच्या चर्चेऐवजी जया बच्चन यांनी थेट १२ निलंबित खासदारांच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका करायला सुरुवात केली. आम्हाला न्याय हवा आहे.
आम्ही सरकारकडून न्यायाची अपेक्षा करत नाही, पण तुमच्याकडून करू शकतो. तुम्ही या सभागृहाच्या किंवा बाहेर बसलेल्या १२ सदस्यांना कसं संरक्षण देत आहात? असा सवाल त्यांनी सभापतींना केला.
विधेयकावर चर्चा करत नसल्याचं सभापतींनी सांगताच ही माझी बोलण्याची वेळ आहे. आम्हाला तीन ते चार तास फक्त एक क्लेरिकल एररवर चर्चा करण्यासाठी दिले का? असं त्या म्हणाल्या. तसेच, विरोधी बाकांवर बसलेल्या सदस्यांना उद्देशून त्या म्हणाल्या, मैं आप से पूछती हूँ, आप किस के सामने बिन बजा रहे हो?
भाजपा खासदार जुगल लोखंडवाला यांनी जया बच्चन यांना उद्देशून काहीतरी टिप्पणी केली. यामुळे गोंधळ अजूनच वाढला आणि जया बच्चन यांचा पारा त्याहून जास्त वाढला. ते माझ्यावर वैयक्तिक टिप्पणी कशी करू शकतात? ही फार वाईट बाब आहे की तुमच्यामध्ये थोडाही सेन्स नाही आणि बाहेर बसलेल्या आपल्या सहकाऱ्यांबाबत थोडाही सन्मान नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला. त्या म्हणाल्या, तुम्हा लोकांचे वाईट दिवस फार लवकर येणार आहेत, मी तुम्हाला शाप देते.
जया बच्चन यांनी प्रतिक्रिया देताना कुणावरही टीका करणं टाळलं. ह्लमला कुणावरही वैयक्तिक टिप्पणी करायची नाही. जे काही घडलं, ते फार दुदैर्वी होतं आणि त्यांनी अशा पद्धतीने बोलायला नको होते.
लोखंडवाला म्हणाले, तुम्ही ड्रामा करू नका असं जेव्हा मी म्हणालो, तेव्हा संपूर्ण विरोधी पक्षांना उद्देशून मी म्हणालो होतो. नंतर मला सांगण्यात आलं की जया बच्चन सभागृहात संतापल्या आहेत. मी कुणाविरोधातही वैयक्तिक टिप्पणी केलेली नाही. मी सर्व विरोधकांकडे बघून ते म्हणालो होतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App