कोरोना प्रतिबंधक लसीकरणातील महत्वाचा टप्पा पार, देशात पन्नास कोटींहून अधिक लसीचे डोस

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने देशात महत्वाचा टप्पा पार केला आहे. एक मोठा टप्पा गाठला आहे. देशात आतापर्यंत करोनावरील लसीचे ५० कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून याचे कौतुक केले आहे.More than fifty crore vaccine doses in the country have crossed the milestone of corona preventive vaccination

देशात शुक्रवारी ४३.२९ लाख नागरिकांना कोरोनाची लस दिली गेली आहे. लसीकरण मोहिमेचा हा टप्पा पार केल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी कौतुक केले आहे. त्यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. सरकारने ‘सर्वांसाठी लस, मोफत लस’ या मोहीमेअंतर्गत सर्व नागरिकांचे लसीकरण करणार आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.



देशात आतापर्यंत कोरोना लसीचे ५० कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. ४० कोटी ते ५० कोटींचा आकडा हा अवघ्या २० दिवसांत पूर्ण झाला आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं.करोनाविरोधात भारताच्या लढाईने आता वेग पकडला आहे. लसीकरणाचा आकडा हा ५० कोटींवर गेला आहे. लसीकरण मोहीम अशाच प्रकारे सुरू राहील. सर्वांना ‘लस, मोफत लस’ या धोरणानुसार सर्व नागरिकांना लस दिली जाईल, अशी आशा आहे’, असं पंतप्रधान मोदी ट्वीटमध्ये म्हणाले.

देशातील करोनावरील लसीकरण मोहीमेला या महिन्यापासून आणखी वेग मिळणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक या लस उत्पादन करणाºया दोन कंपन्या मिळून महिन्याला आणखी ४ कोटींहून अधिक डोसचे उत्पादन करणार आहेत. याचा थेट फायदा देशाला होणार आहे, असे केंद्र सरकारने म्हटलं आहे.

कोविशिल्ड लसीचे आता महिन्याला १२ कोटी डोसचे उत्पादन होईल. आधी ११ कोटी डोसचे उत्पादन केले जात होते, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटने दिली. तर भारत बायोटेक आपली कोवॅक्सिन लसीचे उत्पादन २.५ कोटींहून वाढवून ५.८ कोटीं करणार आहे. यानुसार देशाला वर्षाअखेरपर्यंत १३६ कोटी डोसचा पुरवठा केला जाणार आहे.

More than fifty crore vaccine doses in the country have crossed the milestone of corona preventive vaccination

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात