पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला अमेरिका दौरा संपवून इजिप्त मध्ये दाखल झाले आहेत. पण त्यांच्या अमेरिका दौऱ्यात, भारतात लोकशाही आहे का?? आणि मुस्लिमांचे मानवाधिकार हनन का होते आहे??, असा पत्रकार परिषदेतला प्रश्न खूप गाजला आणि त्याला पंतप्रधान मोदींनी दिलेले, “सबका साथ सबका विकास सबका विश्वास” हे उत्तर अधिक गाजले. Modi in USA : emergence of selective love for democracy and muslim rights during Modi USA visit by Barack Hussein Obama and others
पण पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यात मुस्लिमांविषयी प्रश्न विचारणारी महिला नेमकी कोण होती??, याचा खुलासा भारतात लगेच होऊ शकला नव्हता. शिवाय नेमकी वेळ साधून मोदींच्या अमेरिका दौऱ्यातच भारतातल्या लोकशाही विषयी आणि मुस्लिमांच्या हिताविषयी प्रेमाचा कढ आलेली ती काही एकमेव महिला पत्रकार नव्हती. तिच्या खेरीज अन्य तीन जणांना देखील मोदींच्या दौऱ्यात लोकशाही आणि मुस्लिम प्रेमाचा कढ आला. त्यांची नावे आहेत, बराक हुसेन ओबामा, इलाहान उमर, रशिदा तालीम आणि सबरिना सिद्दिकी!!
अमेरिकन जीवनावर विशिष्ट प्रभाव टाकणाऱ्या या चौघांना भारतातल्या लोकशाही आणि मुसलमानांविषयी “फार काळजी” वाटल्याचे मोदींच्या अमेरिका दौऱ्यात विशेषत्वाने निदर्शनास आले.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक हुसेन ओबामा यांनी सीएनएन या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत भारताल्या मुस्लिमांविषयी चिंता व्यक्त केली. मात्र “ही चिंता” व्यक्त करण्यासाठी बराक हुसेन ओबामा यांनी साडेचार लक्ष अमेरिकन डॉलर एवढी लाच घेतल्याचा आरोप सोशल मीडियात झाला. त्याच वेळी अमेरिकन काँग्रेसचे सदस्य असलेले इलाहान उमर आणि रशिदा तालीम यांना देखील भारतीय मुस्लिमांविषयी “फार चिंता” वाटली. हे दोघेही अमेरिकन काँग्रेसचे सदस्य असले, तरी मुळात ते पाकिस्तानी वंशाचे आहेत. “इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान” मधल्या अत्यंत अस्वस्थ करणाऱ्या घडामोडी विषयी घडामोडींविषयी या दोघांना फारशी चिंता नाही. पण धर्मनिरपेक्ष भारतातल्या मुस्लिमांविषयी मात्र त्यांना “फार मोठी चिंता” आहे. आणि ही चिंताच इलाहान उमर आणि रशिदा तालीम या दोघांनी मोदींच्या दौऱ्यात व्यक्त केली.
भारतातल्या लोकशाही आणि मुस्लिमांच्या अधिकार हननाविषयी मोदींना पत्रकार परिषदेत ज्या महिला पत्रकाराने प्रश्न विचारला, तिचे नाव सबरिना सिद्दिकी. ती वॉल स्ट्रीट जर्नलची राजकीय पत्रकार आहे. “व्हाईट हाऊस” हा तिचा “बीट” आहे. तिची आई पाकिस्तानी वंशाची आहे आणि तिचा वांशिक संबंध भारतात दुहीची बीजे पेरणाऱ्या सर सय्यद अहमद खान यांच्याशी आहे.
सबरिना सिद्दिकीने मोदींना भारतातल्या लोकशाही आणि मुस्लिमांच्या मानवी हक्काविषयी प्रश्न विचारताच, त्यांनी ठामपणे भारतात कोणत्याही प्रकारचा धार्मिक, वंशिक, जातीय भेदभाव करण्यात येत नाही. भारताचे धोरण सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास हेच राहिले आहेत, असे स्पष्ट केले. भारताच्या घटनात्मक लोकशाही विषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. पंतप्रधान मोदींचे हे उत्तर फार गाजले. पण मूळ प्रश्न विचारणारी महिला पत्रकार सर सय्यद अहमद खान यांच्या वंशाशी संबंधित आहे, हे तोपर्यंत सर्वांना माहिती नव्हते. तिने विचारलेला प्रश्न आणि मोदींनी दिलेले उत्तर यानंतर सबरिना सय्यद हिचे 2014 मधले एक ट्विट व्हायरल झाले. त्यात तिने आपला वंश हा सय्यद अहमद खान यांच्याशी संबंधित आहे हे उघड लिहिले आहे आणि भारत – पाकिस्तानला मिळालेले स्वातंत्र्य हे त्यांचे “उपकार” असल्याचाही दावा तिने केला आहे.
सर सय्यद अहमद खान यांनी इंग्रज आणि हिंदू विरुद्ध रक्तरंजित जिहाद पुकारला होता. या संदर्भातल्या एका लेखाची लिंक तिने ट्विटमध्ये दिली आहे.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात भारतातल्या लोकशाही विषयी आणि इथल्या अल्पसंख्यांक मुस्लिमांच्या मानवाधिकाराविषयी प्रेमाचे जे विशिष्ट कढ आले, त्याची मूळ रूपे आणि प्रभावी नावे वर दिली आहेत. यात “बिटवीन द लाईन्स” वाचण्यासारखे फार काही नाही!!… याचा अर्थ सहज समजून येतो.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App