पंतप्रधान मोदी इजिप्त दौऱ्यावर; कैरो विमानतळावर ‘’गार्ड ऑफ ऑनर’’ने स्वागत!

Modi egypt vist

तब्बल २६ वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान द्विपक्षीय भेटीसाठी इजिप्तला पोहोचले

विशेष प्रतिनिधी

कैरो : तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी इजिप्तच्या दोन दिवसांच्या राज्य दौऱ्यासाठी कैरो येथे शनिवारी सायंकाळी पोहोचले. पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच इजिप्त दौरा आहे. कैरो विमानतळावर इजिप्तच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले, त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. PM Modi on Egypt visit Welcomed by Guard of Honor at Cairo Airport

तब्बल २६ वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान द्विपक्षीय भेटीसाठी इजिप्तला पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदींची कैरोमध्ये इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मैडबोलींशी राउंडटेबल कॉन्फरन्स पार पडली. यानंतर त्यांनी भारतीय समुदायातील लोकांशी संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अल हकीम मशिदीला भेट देतील. यानंतर ते हेलिओपोलिस वॉर सेमेटरीला भेट देतील. त्यानंतर ते इजिप्शियन प्रेसिडेंसीमध्ये आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील. याशिवाय मोदी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष एल सिसी यांचीही भेट घेणार आहेत.

PM Modi on Egypt visit Welcomed by Guard of Honor at Cairo Airport

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात