वृत्तसंस्था
अलवर : केंद्रातील मोदी सरकार नव्या शैक्षणिक धोरणामध्ये वैद्यकीय आणि तांत्रिक शाखांसह विविध शाखांचे शिक्षण देशी भारतीय भाषांमध्ये देण्याचा आग्रह धरत असताना दुसरीकडे राहुल गांधींनी मात्र इंग्रजी शिक्षणाकडेच आपला कल दाखवला आहे. Modi government’s emphasis on indigenous languages in the new education policy
नव्या शैक्षणिक धोरणात केंद्र सरकारने वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण देखील भारतीय भाषांमध्ये सुरू केले आहे हे शिक्षण आतापर्यंत फक्त इंग्रजी भाषेतून घेता येत होते मात्र इंग्रजी भाषेची गुलामी नष्ट करण्यासाठी केंद्र सरकारने भारतीय भाषांमध्ये शिक्षण देण्याची पाऊल उचलले आहे या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी मात्र इंग्रजी शिक्षणाकडे कल दाखवला आहे.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सोमवारी, १९ डिसेंबर रोजी राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात दाखल झाली. अलवर जिल्ह्यात ही यात्रा तीन दिवस राहणार आहे. या ठिकाणी राहुल गांधी यांनी हिंदी भाषा द्वेष प्रकट केला.
काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत भाषण करताना राजस्थानात इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याच्या योजनेचे कौतुक केले. राजस्थानमधील प्रत्येक मुलाला इंग्रजीमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळावी, असे सांगत भाजपच्या सर्व नेत्यांचे खासदार, आमदार आणि मुख्यमंत्र्यांची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाऊन इंग्रजी शिकतात आणि ते इतरांना वेगळी भाषणे देतात.
मात्र, गरीब मजुरांच्या मुलांनी इंग्रजी शिकावे असे त्यांना वाटत नाही का? तुम्ही मोठी स्वप्ने पाहावीत असे त्यांना वाटत नाही का? भारतातील सर्व भाषांचा अभ्यास झाला पाहिजे, पण अमेरिका आणि इतर देशांत बोलण्यासाठी हिंदीचा उपयोग होणार नाही, फक्त इंग्रजीचा उपयोग होईल. गरिबांच्या मुलाने इंग्रजी शिकून अमेरिकेतील तरुणांवर इंग्रजी भाषेने मात करावी. राजस्थानमध्ये 1700 इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या असून दहा हजार शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे, मात्र हे प्रमाण कमी आहे. राजस्थानच्या प्रत्येक मुलाला इंग्रजी शिकण्याची संधी मिळाली पाहिजे, असेही राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींच्या या भाषणाचे सोशल मीडियात तीव्र पडसाद उमटले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App