रद्दी व भंगार विकुन मोदी सरकारची ४० कोटी कमाई

Modi Government

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: दिवाळीच्या आधी केंद्र सरकारने मंत्रालय तसेच निरनिराळ्या विभागात सफाई मोहीम हाती घेतली. १३ लाख ७३ हजारपेक्षा जास्त फाईल्सचे वर्गीकरण करून नको असलेल्या फाईल्स रद्दीत दिल्याने निरनिराळ्या कार्यालयात ९.०२ स्क्वेअर फूट जागा रिकामी झाली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सोमवारी या विशेष अभियानाची माहिती देताना सांगितले की जुन्या व वापरात नसलेल्या फाइल्स बाहेर काढल्या आहेत. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की या विशेष स्वच्छता अभियानास २ ऑक्टोबरला सुरुवात करून ३१ ऑक्टोबर पर्यंत मंत्रालयात व विभागात काम चालू केले होते. यादरम्यान १५ लाख २३ हजार फाइल्स उपयोगी आहेत का याची तपासणी करून १३ लाख ७६ हजार फाईल रद्द करण्यात आल्या.

Modi Government earns 40 crores from the sale of scrap and unwanted files

या विशेष अभियानांतर्गत ३ लाख २८ हजार तक्रारींपैकी ३ लाख ३ हजार तक्रारींचे निवारण केवळ तीस दिवसात केले गेले. सदस्याना आलेल्या ११०५७ प्रकारांपैकी ८२८२ पत्रांना उत्तर दिले गेले. ८३४ पैकी ६८५ नियम व कार्यप्रणाली यादरम्यान सोप्या करण्यात आल्या. जितेंद्र सिंह म्हणाले की, या विशेष स्वच्छता अभियानाच्या दरम्यान मिळालेली रद्दी व भंगार यांची ४० कोटी रुपये किंमत आली. या भंगारमध्ये इलेक्ट्रॉनिकस्क्रॅप पण समाविष्ट आहे.


पाच देशांकडून भारताच्या कोरोना लसीकरण प्रमाणपत्राला मान्यता; प्रवाशांची मोठी सोय


केंद्रीय मंत्री म्हणाले की, जुन्या फाईल्स तपासून नको असलेल्या फाईल्स काढून टाकल्या. स्वच्छता तसेच नियोजनासाठी हे काम केले. अधिक चांगले काम व व्यवस्थितपणा यासाठी असे अभियान वेळोवेळी राबविण्यात येणार आहे. जितेंद्र सिंह म्हणाले की, निरनिराळ्या कार्यालयात व मंत्रालयात हे अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुचनेनुसार चालू केले होते. आता अभियान पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल पंतप्रधान मोदी यांना पाठवणेत येईल.

Modi Government earns 40 crores from the sale of scrap and unwanted files

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात