मोदी आणि योगी आदित्यनाथ म्हणजे देवाने बनविलेली अप्रतिम जोडी , राजनाथ सिंह यांनी केले कौतुक


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ही तर देवाने बनवलेली अप्रतिम जोडी आहे. या दोघांनी केंद्रात आणि राज्यात सुरू केलेल्या कल्याणकारी योजना राबवणे सोपी गोष्ट नाही, असे कौतुक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे.Modi and Yogi Adityanath are an amazing pair made by God, praised by Rajnath Singh

राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेशात विकासकामांचे लोकार्पण केले. यावेळी योगी आदित्यनाथही सोबत होते. लखनऊमध्ये १७१० कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.संरक्षण मंत्री म्हणाले, योगी आदित्यनाथ गुन्हेगारांना कडक शिक्षा देतात. त्यामुळे त्यांचे नाव ऐकून गुन्हेगार घाबरतात. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री नसते तर, लखनऊ मतदारसंघाचा इतका विकास करू शकलो नसतो.

आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात राज्यात झालेली विकासकामे कौतुकास्पद आहेत. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ या दोघांची अप्रतिम जोडी देवाने बनवली आहे.

संरक्षण मंत्रालय अंतर्गत संरक्षण संशोधन आणि विकास संस्था लखनऊजवळ ब्रह्मोस क्षेपणास्त्र तयार करेल. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी एका महिन्यात २५० एकर जमीन उपलब्ध करून देणार असल्याचेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली सरकार संपूर्ण राज्याचा विकास करेल. कोणत्याही आघाडीवर मागे राहणार नाही

Modi and Yogi Adityanath are an amazing pair made by God, praised by Rajnath Singh

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय