पेगाससच्या तंत्रज्ञानामुळेच कोट्यवधी लोक रात्री झोपतोहेत निर्धास्त, एनएसओ कंपनीचा दावा


विशेष प्रतिनिधी

जेरूसलेम : भारतासह जगातील अनेक देशांत हेरगिरीसाठी पेगासस तंत्रज्ञान वापरल्याचा दावा केला जात आहे. मात्र, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पेगासससारखे तंत्रज्ञान असल्यानेच कोट्यवधी लोकांना रात्रीची झोप निर्धास्त घेता येते,Millions sleep at night because of Pegasus technology, NSO claims

असा दावा इस्रायलमधील सायबर सुरक्षा कंपनी एनएसओ समूहाने केला आहे. या तंत्रज्ञानाचे संचालन आपण करत नाही वा आपल्या ग्राहकांकडून गोळा केलेली माहिती आपल्याकडे पोहचत नाही, असेही कंपनीने म्हटले आहे.



भारतासह अनेक देशांमधील पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते, राजकीय नेते आणि अन्य लोकांची हेरगिरी करण्यासाठी पेगासस सॉफ्टवेअरच्या कथित वापराने टेपिंग आणि हॅक केल्यावरून गदारोळ झाला असतानाच, एनएसओ समूहाने मात्र या प्रकाराचे समर्थन केले आहे.

आंतरराष्ट्रीय माध्यम संघटेनुसार, इस्रायल कंपनीने विविध सरकारांना विकल्या गेलेल्या स्पायवेअरद्वारे राजकीय नेते, मानवाधिकार कार्यकर्ते आणि पत्रकार यांना लक्ष्य केले होते. गु

प्तहेर आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था एन्क्रिप्टेड अ‍ॅप अंतर्गत लपविलेल्या माहितीचा शोध घेऊन दहशतवादी घटना आणि गुन्हेगारी कृत्ये रोखण्यास मदत करतात, असे एनएसओने म्हटले आहे.

एनएसओकडून जगभरातील सायबर इंटेलिजन्स कंपन्या, अनेक प्रमुख देशांच्या सरकारांना सायबर सुरक्षा साधने उपलब्ध करून देते. कारण, त्यांच्याकडे समाज माध्यमावरील संशयास्पद मजकुरावर लक्ष ठेवण्यासाठी मजबूत यंत्रणा आणि नियामक उपाय नसतात, असा दावाही कंपनीने केला आहे.

Millions sleep at night because of Pegasus technology, NSO claims

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात