लाखो लोकांना चुली पेटवायला लागल्यात; गॅस सिलेंडर दरवाढीवरून राहुल गांधींचा मोदींवर निशाणा


प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या करोडो महिलांना चुलीच्या धुरापासून मुक्ती देण्यासाठी उज्ज्वला योजनेतून एलपीजी गॅस सिलेंडरचे वाटप केले असले तरी सिलेंडरचे भाव गगनाला भिडले आहेत. या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. Millions of people started lighting stoves; Rahul Gandhi targets Modi over gas cylinder price hike

विकासाच्या जुमल्यापासून दूर लाखो लोकांना पुन्हा चुली पेटवायला लागल्या आहेत. मोदींच्या विकासाची गाडी रिव्हर्स गियर मध्ये आहे आणि तिचे ब्रेक पण फेल झाले आहेत, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.



या ट्विट बरोबरच त्यांनी जनसत्ताची एक बातमी शेअर केली आहे. एका सर्वेनुसार 42 टक्के गरीब लोकांनी एलपीजी गॅस सिलेंडर वापरणे सोडून दिले असून पुन्हा लाकडाच्या चुलीचा वापर सुरू केला आहे. कारण गॅस सिलेंडरचे वाढते दर गरिबांना परवडत नाहीत, असे या बातमीत म्हटले आहे. ही बातमी राहुल गांधींनी आपल्या ट्विटरवर शेअर केली आहे त्याच वेळी मोदींच्या विकासाच्या जुमल्याची गाडी रिव्हर्स गिअर मध्ये आहे आणि तिचे ब्रेक फेल आहेत, अशी टीकाही केली आहे.

दिवाळीच्या आधी एक नोव्हेंबरला एलपीजी गॅस सिलेंडरचे भाव तब्बल 266 रुपयांनी वाढले आहेत. या मुद्द्यावरूनच राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

Millions of people started lighting stoves; Rahul Gandhi targets Modi over gas cylinder price hike

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात