विशेष प्रतिनिधी
जीनिव्हा : संघर्ष आणि नैसर्गिक आपत्ती या कारणांमुळे देशांतर्गत विस्थापनाचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. गेल्या दशकभरातील विस्थापित होण्याचे हे सर्वांधिक प्रमाण असल्याचे दिसून आले आहे. Migration increase in world due to corona
गेल्या वर्षीच्या अखेरीपर्यंत जगभरात साडे पाच कोटी लोक त्यांच्या देशातच बेघर होऊन इतरत्र राहत होते. वादळे, पूर या नैसर्गिक आपत्तींबरोबरच दोन गटांमधील किंवा देशांमधील संघर्षही या वाढत्या विस्थापनाला कारणीभूत असल्याचे या संस्थेने म्हटले आहे.
अनेक वेळा लोकांना दोन किंवा अधिक वेळा विस्थापित व्हावे लागले आहे. देशांतर्गत विस्थापित झालेल्यांची संख्या, आपला देश सोडून इतर देशांमध्ये निर्वासित म्हणून राहणाऱ्यांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा अधिक आहे.
म्यानमारमधील लष्करी बंडानंतर या देशातून जवळपास चार ते सहा लाख नागरिक भारतात पळून आले असल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी काढला आहे. याशिवाय, म्यानमारमध्ये संघर्षामुळे ६०,७०० जण विस्थापित झाले आहेत. गेल्या तीन महिन्यांत जवळपास सतराशे जणांनी थायलंडमध्ये आश्रय घेतला असल्याचेही संयुक्त राष्ट्रांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App