शुक्रवारी पहाटे महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात चकमकीत 13 नक्षली ठार झाले आहेत. ताज्या माहितीनुसार आतापर्यंत 6 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. गडचिरोलीचे डीआयजी संदीप पाटील यांनी याला दुजोरा दिला आहे. अद्यापही सी-60 कमांडो आणि नक्षलवाद्यांमध्ये मधून-मधून गोळीबार सुरू आहे. पाटील यांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली येथील कटिमाच्या जंगलातून 6 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. Gadchiroli Naxal Encounter 13 Naxalites Killed In Gadchiroli in Encounter Between C 60 Commandos And Naxalites
विशेष प्रतिनिधी
गडचिरोली : शुक्रवारी पहाटे महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात चकमकीत 13 नक्षली ठार झाले आहेत. ताज्या माहितीनुसार आतापर्यंत 6 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. गडचिरोलीचे डीआयजी संदीप पाटील यांनी याला दुजोरा दिला आहे. अद्यापही सी-60 कमांडो आणि नक्षलवाद्यांमध्ये मधून-मधून गोळीबार सुरू आहे. पाटील यांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली येथील कटिमाच्या जंगलातून 6 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत.
गत महिन्यात गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील गुट्टा पोलिस ठाण्यात नक्षलवाद्यांनी ग्रेनेड फेकला. स्फोट न झाल्याने दुर्घटना टळली होती. मात्र, नक्षलवाद्यांनी पोलीस स्टेशन उडवण्याचा प्रयत्न केल्याने ही मोठी घटना मानली जात होती. त्यानंतर सी-60 कमांडोने ही कारवाई केली आहे.
गडचिरोली जिल्ह्याची स्थापना झाल्यापासून संपूर्ण भागात नक्षलवादी कारवाया वाढल्या आहेत. यावर बंदी घालण्यासाठी तत्कालीन एसपी केपी रघुवंशी यांनी 1 डिसेंबर 1990 रोजी सी-60 ची स्थापना केली. त्यावेळी या सैन्यात केवळ 60 खास कमांडो भरती करण्यात आले होते, ज्यामुळे हे नाव पडले. नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी गडचिरोली जिल्हा दोन भागांत विभागला गेला. प्रथम उत्तर विभाग, द्वितीय दक्षिण विभाग.
या कमांडोना विशेष प्रशिक्षण दिले जाते. दिवस आणि रात्र केव्हाही कारवाई करण्यासाठी ते तयार असतात. त्यांचे प्रशिक्षण हैदराबाद, एनएसजी कॅम्प मानेसर, कांकेर, हजारीबाद येथे होते. नक्षलविरोधी मोहिमेव्यतिरिक्त हे सैनिक नक्षलवाद्यांचे कुटुंब, नातेवाईकांना भेटून सरकारी योजनांची त्यांना माहिती देत असतात. अनेकांना पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करतात. याशिवाय ते नक्षलग्रस्त भागातील प्रशासकीय अडचणींबद्दलची माहितीही गोळा करतात.
Gadchiroli Naxal Encounter 13 Naxalites Killed In Gadchiroli in Encounter Between C 60 Commandos And Naxalites
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App