‘CAPF’ मध्ये कॉन्स्टेबल पदाच्या परीक्षेसाठी आता हिंदी, इंग्रजी व्यतिरिक्त अन्य १३ प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात गृह मंत्रालयाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वत्र स्वागत

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (सीएपीएफ) कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) या पदांसाठी हिंदी आणि इंग्रजी शिवाय १३ प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा घेण्याचा गृह मंत्रालयाने ऐतिहासिक निर्णय घेतला असून, या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. MHA approves conduct of Constable  examination for CAPFs in 13 regional languages in addition to Hindi and English

एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, CAPF मध्ये स्थानिक तरुणांची संख्या वाढवण्यासाठी आणि प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांच्या पुढाकाराने हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. CAPF मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), इंडो-तिबेट सीमा पोलीस (ITBP), सशस्त्र सीमा बल (SSB) आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) यांचा समावेश होतो.

‘’पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात गृहमंत्रालयाने ऐतिहासिक निर्णय घेत, सीएपीएफमध्ये कॉन्स्टेबल पदांसाठी हिंदी आण इंग्रजी व्यतिरिक्त १३ प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा आयोजित करण्यास मंजूरी दिली आहे.’’ अशी माहिती देण्यात आली आहे.

१३ प्रादेशिक भाषा कोणत्या ? –

हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त १३ प्रादेशिक भाषांमध्ये, मराठी, आसामी, बंगाली, गुजराती, मल्याळम, कन्नड, तामिळ, तेलगू, ओडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी आणि कोकणी यांचा समावेश आहे. या १३ प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षेची प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे.

MHA approves conduct of Constable  examination for CAPFs in 13 regional languages in addition to Hindi and English

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात