NIA Court : काश्मिरी विद्यार्थ्यांना पाकिस्तानात मेडिकल ऍडमिशन्स घोटाळा; हुर्रियत नेत्यांविरुद्ध युएपीए कायद्याअंतर्गत आरोपपत्र दाखल!!


वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू – काश्मीरमधील निवडक विद्यार्थ्यांना पाकिस्तानमधल्या मेडिकल कॉलेजेस मध्ये एमबीबीएस आणि तत्सम कोर्ससाठी ऍडमिशन देऊन तेथे दहशतवादी तयार करण्यासाठी नेटवर्क तयार केलेल्या हुरियत कॉन्फरन्सच्या नेत्यांविरुद्ध राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयए कोर्टाने आज विशेष आरोपपत्र दाखल केले आहे. दहशतवाद प्रतिबंधक कायदा युएपीए तसेच भारतीय फौजदारी कायद्याच्या अनेक कलमांनुसार हे आरोप पत्र दाखल केले आहे. सय्यद मेहमूद शहा गिलानी, अब्बास अहमद आदी नेत्यांविरुद्ध एनआयए कोर्टाने आरोपपत्र दाखल केले आहे. Medical admissions scam in Kashmiri students in Pakistan

– यूपीए सरकारमध्ये बडदास्त

हेच ते हुरियत कॉन्फरन्सचे नेते आहेत, जे पश्चिम काश्मीर परिसरामध्ये आपणच लोकांचे प्रतिनिधी आहोत असा दावा करत आधीच्या केंद्रातील यूपीए सरकारची वाटाघाटी करत होते. दिल्लीत या नेत्यांची त्यावेळच्या केंद्र सरकार मोठी बडदास्त ठेवत होते.

  • काश्मीर प्रश्नामध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोनच पक्ष असताना काश्मिरींचा तिसरा पक्ष असल्याचा हुर्रियत कॉन्फरन्सच्या नेत्यांचा दावा होता. भारत आणि पाकिस्तान यांच्या वाटाघाटींमध्ये आमचा तिसरा पक्ष सामील करून घेतला पाहिजे असा दावा करत हे नेते दोन्ही देशांमधल्या सरकारांबरोबर वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करत होते. यासाठी विविध सांस्कृतिक संमेलने इफ्तार पार्ट्या यांचा वापर करून विविध देशांचे राजदूत, आंतरराष्ट्रीय संघटना आणि समुदाय यांना निमंत्रित करत होते.
  •  एकीकडे अधिकृत पातळीवर आपण काश्मिरी जनतेचे प्रतिनिधित्व करतो असा दावा करत असलेले हेच नेते छुप्या पद्धतीने विविध पातळ्यांवर दहशतवाद्यांना प्रोत्साहन मिळेल आणि दहशतवादी कृत्यांना चिथावणी मिळेल अशा कारवायांमध्ये गुंतले होते.
  •  यातूनच काश्मीरमधील उच्चशिक्षित युवकांना दहशतवाद्यांच्या कॅडरमध्ये भरती करण्याची योजना हुर्रियत नेत्यांनी अमलात आणली.
  •  पाकिस्तानातील विविध मेडिकल कॉलेजेस मध्ये तसेच अन्य उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश देण्याचे बहाणे करून हजारो काश्मिरी विद्यार्थ्यांना या नेत्यांनी फसविले आहे. अनेकांना त्यांनी पाकिस्तानातल्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश देऊन पाठवले देखील आहे. परंतु हे करताना संबंधित विद्यार्थ्यांकडून आणि त्यांच्या पालकांकडून कोट्यवधी रुपयांची देणगी या हुर्रियत नेत्यांनी उकळली आहे आणि या देणगीतूनच टेरर फंडिंग सारख्या देशविघातक कृत्यांना या नेत्यांनी चिथावणी दिली आहे.
  •  काश्मीर मधून 370 कलम म्हटल्यानंतर तेथे बर्‍याच गोष्टींचा नव्याने उलगडा होऊ लागला. राष्ट्रीय तपास संस्था एनआयएने 2 वर्षांपूर्वी मेडिकल ॲडमिशन रॅकेटचा पर्दाफाश केला. यामध्ये सुरवातीला काश्मीर मधल्या स्थानिक राजकीय पक्षांचे अनेक नेते अडकल्याचे आढळले. त्याचबरोबर प्रामुख्याने यामध्ये हुरियत कॉन्फरन्सच्या नेत्यांचा महत्त्वाचा रोल असल्याचे स्पष्ट झाले.
  •  एनआयएनने गेल्या 2 वर्षांमध्ये या सर्व ऍडमिशन रॅकेटचा छडा लावून आता विशेष कोर्टात हुर्रियत नेत्यांनी विरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. याची आता लवकरच सुनावणी सुरू होऊन प्रत्यक्ष कायदेशीर कारवाईला म्हणजेच अटक, अजामीनपात्र वॉरंट आदी प्रक्रियेला सुरुवात होणे अपेक्षित आहे. खऱ्या अर्थाने हुर्रियतचे नेते आता भारतीय संरक्षण कायदा तसेच भारतीय फौजदारी कायदा यांच्या कचाट्यात सापडले आहेत.

Medical admissions scam in Kashmiri students in Pakistan

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात