विशेष प्रतिनिधी
बद्रीनाथ : बद्रीनाथ मंदिर परिसरात नमाज पठण केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्यासंबंधीचा खुलासा आला आहे. काही कामगारांनी बद्रीनाथ मंदिर परिसरात नव्हे तर त्यापासून 700 मीटर दूर अंतरावर नमाज पठण केले असे आढळून आले आहे. यासंदर्भात गुन्हा देखील दाखल झाला असून कोरोना काळात बेकायदेशीररित्या जमाव जमवण्याचा हा गुन्हा आहे.Maulana Abdul latif kazmi claims badrinath temple is not Hindu shrine, but it is Muslim shrine badruddin shah
मात्र, या नमाजपठणाच्या पार्श्वभूमीवर देवबंदच्या एका मौलानाचा सन २०१७ मधील व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये हा मौलाना अब्दुल लतिफ काझमी हा बद्रीनाथ धाम हे हिंदूंचे देवस्थान नसून ते बद्रुद्दीन शाह आहे, असे असा दावा करताना दिसत आहे. मौलानाचा हा व्हिडिओ प्रत्यक्षात 2017 मधील आहे.
परंतु सध्या तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जात आहे. बद्रीनाथ धाम ताबडतोब मुसलमानांच्या हवाली करण्यात यावे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी मौलाना अब्दुल लतीफ काजमी करीत असल्याचेही व्हिडिओ दिसत आहे.
हा सर्व प्रकार उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारा आहे याची दखल उत्तरप्रदेश सरकारने घेतली आहे, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले आहे.
मौलानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर हिंदू संघटनांनी देखील त्यावर आक्षेप घेणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून मौलाना अब्दुल लतीफ काजमीवर ताबडतोब कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याच बरोबर मंदिर परिसरात नमाजपठण करणाऱ्या व्यक्तींविरोधात देखील कायदेशीर कारवाईची मागणी बद्रीनाथ च्या स्थानिक नागरिकांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App