विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : रशियाचे सैन्य युक्रेनच्या एका एका भागावर हल्ला करत मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी करत आहे. मात्र आता युक्रेनी सैन्याने रशियाला मोठा धक्का दिला आहे. कीव शहराच्या ईशान्येकडील होस्तोमेल या शहराजवळ युक्रेनी सैन्याने मिसाइल डागले असून त्यात 56 टँक नष्ट झाले व तुकडीतील मोठ्या प्रमाणात सैनिक मारले गेल्याचे वृत्त समोर आले आहे. Massive damage to Russia by Ukrainian missiles
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदीमीर झेलेन्स्की यांना टिपण्यासाठी रशियाने चेचन स्पेशल फोर्सला धाडले होते. मात्र या फोर्सच्या एका मोठ्या तुकडीचा युक्रेनी सैन्याने वेध घेतला आहे. चेचन्या राज्याचे प्रमुख रमझान कादिरोव्ह या स्पेशल फोर्सचा प्रमुख आहे.
कादिरोव्ह याच्या अगदी जवळचा समजल्या जाणाऱ्या चेचन फोर्सचा जनरल मॅगोमेद तुशेव या तुकडीचे नेतृत्व करत होता व त्याचाही या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात 56 टँक नष्ट झाले आहेत तर 100 पेक्षा अधिक सैनिक मारले गेले आहेत, त्यामुळे रशियासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App