बिहार विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ‘भाकप माले’च्या सदस्यांनी कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावरुन विधानसभेत गदारोळ केला. सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच त्यांनी सभापतींपुढील हौद्यात धाव घेऊन सरकारविरोधात जोरदार नारेबाजी सुरू केली. सभापतींनी वारंवार समज दिल्यानंतरही ते आपल्या जागेवर परतले नाही. अखेर, त्यांना मार्शल्सकरवी अक्षरश: उचलून सभागृहाबाहेर काढावे लागले. Marshall literally picked up the MLA and drove him out of the House
विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहार विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ‘भाकप माले’च्या सदस्यांनी कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावरुन विधानसभेत गदारोळ केला. सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच त्यांनी सभापतींपुढील हौद्यात धाव घेऊन सरकारविरोधात जोरदार नारेबाजी सुरू केली. सभापतींनी वारंवार समज दिल्यानंतरही ते आपल्या जागेवर परतले नाही. अखेर, त्यांना मार्शल्सकरवी अक्षरश: उचलून सभागृहाबाहेर काढावे लागले.
सभापती विजय कुमार सिन्हा यांनी सभागृहात गदारोळ करणाऱ्या आमदारांना शांत होण्याचे आवाहन केले. पण, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर सिन्हा यांनी त्यांना मार्शल्सकरवी बाहेर काढले. त्यानंतर या आमदारांनी विधानभवन परिसरात धरणे आंदोलन सुरू केले. सभापतींनी राजद आमदार भाई वीरेंद्र यांना त्यांची समजूत काढून सभागृहात आणण्यासाठी पाठवले. त्यानंतर ते पुन्हा सभागृहात परतले. उल्लेखनीय बाब म्हणजे बुधवारीच एमआयएमच्या आमदारांना मार्शल आऊट करण्यात आले होते.
विधानसभेतून मार्शल्सकरवी बाहेर काढल्यानंतर भाकप मालेच्या आमदारांनी सरकारवर मनमानी करण्याचा गंभीर आरोप केला. आंदोलन करणाऱ्या आमदार सुदामा प्रसाद यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
विधानसभा जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी असते. पण, हे प्रश्न मांडणाऱ्या आमदारांना सभागृहाबाहेर काढले जाते. हे अत्यंत चूक आहे. गेल्या वर्षी आमच्या आमदारांनाही मारहाण करण्यात आली होती. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या प्रकरणी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App