इस्लामीक स्टेटच्या बांग्ला देशातील दहशतवाद्यांकडून घुसखोरी लपविण्यासाठी भारतीय मुलींशी विवाह

विशेष प्रतिनिधी

कोलकाता : बांग्ला देशातून इस्लामीक स्टेटच्या दहशतवाद्यांकडून भारतातील घुसखोरी वाढली आहे. आपली ओळख लपविण्यासाठी ते भारतीय मुलींशी विवाह करत आहेत. त्यासाठी हिंदू नावाचाही वापर करत आहेत.Marriage to Indian girls to hide infiltration from Islamic State terrorists in Bangladesh

इस्लामिक स्टेट ही अतिरेकी संघटना भारतात आपले जाळे पसरत आहे. लॉकडाऊन आणि त्यानंतर आलेल्या बेरोजगारीचा फायदा घेऊन जेएमबी, अंसारुल्लाह गुट आणि आयएस या अतिरेकी संघटना देशातील तरुणांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहे.



कोलकाता पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दक्षिण किनाºयावरील हरिदेबपूर येथून तीन संशयितांना अटक केली होती. या अतिरेक्यांची नजीउर रहमान पावेल, मेकैल खान आणि रबीउल इस्लाम अशी नावे आहेत. या तीनही अतिरेक्यांनी योग्य संधी साधत बांगलादेशातून भारतात घुसखोरी केली होती ते कोलकात्यातील एका हायप्रोफाईल भागात राहत होते, अशी देखील माहिती त्यांच्या चौकशीतून समोर आली.

भारतात घुसरखोरी करुन हायप्रोफाईल परिसरात राहणारे अतिरेकी हे देशातील बेरोजगार तरुण-तरुणांना हेरायचे. ते त्यांचे ब्रेनवॉश करायचे. प्रत्यक्ष भेटून किंवा ऑनलाईन चॅट करुनही तरुण-तरुणींचे ब्रेनवॉश करायचे. त्यानंतर ते या तरुणांची अतिरेकी संघटनेत भरती करायचे. या संघटनेने भारतातील 12 राज्यातील तरुणांना आपल्याकडे आकर्षित केल्याचा दावा केला आहे. या संघटनेचे लष्कर-ए-तोयबा आणि अल-कायदा सारख्या संघटनांशी संबंध आहेत. भारतात आपली विचारधारा पसरविण्यासाठी या अतिरेकी संघटना सोशल मीडियाचा प्रचंड वापर करत आहेत.

भारतात घुसखोरी केलेल्या अतिरेक्यांना आपली ओळख लपविण्यासाठी लग्न करणे सोपे माध्यम आहे. या माध्यमातून त्यांना भारताचा नागरिक असल्याचे सिद्ध करण्यासाठी मोठी मदत होते. लग्न हे त्यांचे एकप्रकारे सुरक्षा कवच बनते. ते आपली ओळख लपवण्यासाठी धर्म परिवर्तनही करतात.

कोलकाता पोलिसांनी पकडलेला अतिरेकी पावेल याने याच माध्यमातून आपली ओळख लपवली होती. त्याचं जयराम बेपारी असं हिंदू नाव आहे. त्याने आणि त्याचा सहकारी मेकैल खान उर्फ शेख शब्बीर यांनी हरिदेवपूर भागातील दोन महिलांसोबत मैत्री केली. त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर पुढच्या महिन्यात लग्नाची योजना बनवली.

Marriage to Indian girls to hide infiltration from Islamic State terrorists in Bangladesh

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात