विशेष प्रतिनिधी
“इतिहासाची पुनरावृत्ती; दोन नातू एकत्र; माध्यमे मात्र रंगवताहेत आभासी चित्र!!” हे कालपासून म्हणजे 11 नोव्हेंबर 2022 पासून मराठी माध्यमांमध्ये घडत आहे. कारण आदित्य ठाकरे हे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सामील झाले होते. Marathi media paints wrong picture of Balasaheb Thackeray’s politics by depicting Rahul Gandhi and Aditya Thackeray together in bharat jodo yatra
राहुल – सुप्रिया यात्रेला एवढी प्रसिद्धी नाही
आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी या दोघांच्या संयुक्त भारत जोडो पदयात्रेला जेवढी प्रसिद्धी मराठी माध्यमांनी दिली, तेवढी प्रसिद्धी राहुल गांधी आणि खासदार सुप्रिया सुळे एकत्र चालले त्याला दिली नव्हती. इतकेच नाही, तर राहुल गांधी आणि सुप्रिया सुळे एकत्र चालले तेव्हा, “इतिहासाची पुनरावृत्ती घराण्यांचे वारस एकत्र”, अशा बातमी मराठी माध्यमांनी दिल्या नाहीत. वास्तविक पाहता “घराण्यांचे वारस एकत्र”, ही बातमी अधिक उचित ठरली असती. किंबहुना ती शीर्षकात उल्लेख केल्याप्रमाणे निदान आभासी ठरली नसती.
परंतु मराठी माध्यमांनी एकदा मराठी माध्यमांनी एक नॅरेटिव्ह सेट करायचे ठरवले आहे आणि राजकीय परिस्थिती काहीही असली तरी तो नॅरेटिव्ह पवार – ठाकरेंच्या बाजूचा असला पाहिजे, असेच माध्यमांचे वर्तन आहे. त्यातूनच “इतिहासाची पुनरावृत्ती; दोन नातू एकत्र”, अशा बातम्या माध्यमांनी दिल्या आहेत. पण त्याहीपेक्षा “घराण्यांचे वारस एकत्र” हा नॅरेटिव्ह सेट केला नाही.
आभासी चित्र, खोटे चित्र
यात एक अन्य मुद्दा आहे, तो तितकाच महत्त्वाचा आहे, किंबहुना तो अधिक महत्त्वाचा आहे. इतिहासाची पुनरावृत्ती, दोन नातू एकत्र अशा बातम्या देताना माध्यमांनी इंदिरा गांधी आणि बाळासाहेब ठाकरे यांचा एकत्र फोटो छापला आहे. त्याच्या जोडीला राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो छापला आहे. त्यामुळे जणू काही गांधी आणि ठाकरे घराण्याचा हा दीर्घकालीन “पॉलिटिकल सिक्वेन्स” आहे असे माध्यमांनी मोठ्या चतुराईने भासविण्याचा प्रयत्न केला आहे. पण नेमके हेच ते आभासी चित्र आहे किंबहुना ते राजकीय इतिहासाच्या दृष्टीने खोटे चित्र रंगवले आहे.
बाळासाहेबांची काँग्रेसशी सलगी नाही
कारण संपूर्ण आयुष्यात बाळासाहेब ठाकरे हे एकदाच इंदिरा गांधींना भेटले. ते सुद्धा विशिष्ट राजकीय परिस्थितीत. त्यापलिकडे इंदिराजींशी फार मोठा राजकीय संबंध त्यांचा कधी आला नाही आणि मुंबई महापालिकेत एखादा अपवाद वगळता बाळासाहेबांनी कधीच काँग्रेसशी राजकीय सलगी केली नाही. बाळासाहेबांनी आपल्या राजकारणासाठी जे काही मुद्दे उचलले, मग तो मराठी असो अथवा हिंदुत्व असो कायमच काँग्रेसला टोचणारे आणि काँग्रेस विरोधी राहिले होते. बाळासाहेबांनी इंदिरा गांधींची भेट घेऊन आणीबाणीला पाठिंबा दिला होता, हा अपवाद वगळला तर कायमच गांधी घराण्यावर जोरदारच शरसंधान साधले होते. काँग्रेसशी मग ती अखंड काँग्रेस असो अथवा फुटलेली काँग्रेस असो बाळासाहेबांचा काँग्रेसशी उभा दावा राहिला होता.
उद्धव ठाकरेंचा यू टर्न
पण उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये स्वतःचा राजकीय ट्रॅक चेंज करताना जसा यू टर्न घेतला, तसा बाळासाहेबांनी कधीच घेतला नव्हता. 2019 नंतर उद्धव ठाकरेंनी गांधी घराण्यावर कधीही शरसंधान साधले नाही. उलट त्यांनी शिवसेनेच्या मूळ राजकीय धोरणाला धक्का दिला. हिंदुत्वाचा मुद्दा गुंडाळून ठेवला. मराठी मुद्दा कुठे आहे?, याचा तर भिंग लावून शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा स्थितीत मराठी माध्यमांनी रंगवलेले, “इतिहासाची पुनरावृत्ती; दोन नातू एकत्र; पण मराठी माध्यमे रंगवताहेत आभासी चित्र!!”, असे म्हणायचे नाही तर काय??, हा खरा प्रश्न आहे.
पक्ष गुंडाळून इतरांच्या वळचळणीला
राजकारण हे कधीच साचेबंद नसते. ते प्रभावी असते, हे कितीही खरे मानले तरी त्या प्रवाहामध्ये इतकी सरमिसळ नसते, की आपला मूळ पक्ष इतर सर्व पक्ष पोखरत असताना मूळ पक्षाचीच भूमिका आपण स्वतःच पूर्णपणे नष्ट करून, आपल्यालाच नष्ट करू इच्छिणाऱ्या पक्षांच्या वळसणीला जाऊन बसणे… याला “इतिहासाची पुनरावृत्ती, दोन नातू एकत्र”, असे म्हणत नाहीत… हा यातला खरा कळीचा मुद्दा आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App