Sonia Gandhi Birthday : पीएम मोदी, नितीन गडकरींसह या नेत्यांनी दिल्या सोनिया गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या शुभेच्छा देताना पीएम मोदी म्हणाले- “श्रीमती सोनिया गांधीजींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. मी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो.” Many Leaders Including PM Modi, Nitin Gadkari supriya Sule Wishesh Happy Birthday To Sonia Gandhi


प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या शुभेच्छा देताना पीएम मोदी म्हणाले- “श्रीमती सोनिया गांधीजींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. मी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो.”

दुसरीकडे, केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. गडकरी म्हणाले- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो.

मध्य प्रदेश सरकारमध्ये गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही काँग्रेस अध्यक्षांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले- काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. काँग्रेसच्या सर्वाधिक काळ अध्यक्ष राहिलेल्या सोनिया गांधी गुरुवारी 75 वर्षांच्या झाल्या.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही फोटो ट्वीट करत सोनिया गांधींचे अभिष्टचिंतन केले आहे.

Many Leaders Including PM Modi, Nitin Gadkari supriya Sule Wishesh Happy Birthday To Sonia Gandhi

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!