विशेष प्रतिनिधी
कोलकत्ता : उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या पराभवामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बिथरल्या आहेत. माध्यमांनीच भारतीय जनता पक्षाचा विजय सोपा केला आहे. विरोधी पक्षांनी कॉँग्रेसवर अवलंबून राहून आता उपयोग नाही. उलट कॉँग्रेसचे तृणमूलमध्ये विलिनीकरण करून टाकावे असेही त्यांनी म्हटले आहे.Mamata lashes out at media, lashes out at Congress, calls for Congress merger with Trinamool
ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, उत्तर प्रदेशमध्ये विरोधकांच्या मतांच्या वाटणीचा फायदा भाजपला मिळाला आहे. या निवडणुकीत मीडिया ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला. तुम्ही लोकांनी इतका प्रचार केला की भाजपला जास्त काम करावे लागले नाही. तुम्ही तुमचे काम केले.
आज मी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष किरणमय नंदा यांच्याशी बोलले आणि त्यांना म्हटले की, या निकालाने सपाचे मनोधैर्य खचू देऊ नका.काँग्रेसवर ताशेरे ओढत ममता म्हणाल्या की, आता भाजपशी लढू इच्छिणाऱ्या सर्व पक्षांनी एकत्र काम केले पाहिजे. काँग्रेसवर अवलंबून राहून उपयोग नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App