ममता बॅनर्जी म्हणतात, भाजपाला पश्चिम बंगालमध्ये ७० जागाही मिळणार नाहीत


भाजपला विधानसभा निवडणुकीत 70 जागाही मिळणार नाहीत, असा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की १३५ जागांपैकीच १०० जागा जिंकल्या आहेत. परंतु, मी सांगते की भाजपाला २९४ जागांमधूनही ७० जागा मिळणार नाही, असे त्यांनी सांगितले.


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : भाजपला विधानसभा निवडणुकीत 70 जागाही मिळणार नाहीत, असा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की १३५ जागांपैकीच १०० जागा जिंकल्या आहेत. परंतु, मी सांगते की भाजपाला २९४ जागांमधूनही ७० जागा मिळणार नाही, असे त्यांनी सांगितले. Mamata Banerjee says BJP will not get even 70 seats in West Bengal

जलपायगुडी जिल्ह्यातील डाबग्राम-फुलबाडी येथील सभेत बोलताना ममता म्हणाल्या, पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे, की आतापर्यंत ज्या १३५ जागांवर निवडणुका झाल्या आहेत. त्यात भाजपने आधीच १०० जागा जिंकल्या आहेत. मात्र, मी सांगते, की निवडणूक संपल्यानंतर, भाजपला एकूण २९४ जागांपैकी ७० जागाही मिळणार नाहीत.



भारतीय जनता पक्षावर आरोप करताना ममता म्हणाल्या, भाजप एकाच मुद्द्यावर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे भाष्य करत खोटे बोलत आहे.

गृह मंत्री अमित शाह दार्जिलिंगच्या लेबोंगमध्ये म्हणाले होते, की कुठल्याही प्रकारची एनआरसी होणार नाही. त्यांनी म्हटले आहे, की 14 लाख लोकांची ओळख पटली आहे आणि त्यांना राष्ट्रीय नागरिक रजिस्टरअंतर्गत अवैध प्रवासी शोधण्यासाठी प्रक्रियेच्या आधारे डिटेंशन सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे.

पण १४ लाख लोकांना डिटेंशन सेंटरमध्ये जाण्यास सांगण्यात आले आहे, मात्र, तृणमूल पुन्हा सत्तेत आल्यास पश्चिम बंगालमध्ये वादग्रस्त राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (एनआरसी) लागू होऊ देणार नाही. आपण सर्व जण नागरिक आहात.

Mamata Banerjee says BJP will not get even 70 seats in West Bengal


महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात