विशेष प्रतिनिधी
कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून कोलकाता विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील प्राध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Mamata Banerjee receives death threats on social media, crime against Kolkata University professor
लालबाजार सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तक्रारदार हा विद्यापीठातील रिसर्च स्कॉलर आहे, असे पोलिसांनी सांगितले. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही आणि आरोपीवर आयपीसी कलम 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राध्यापकांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून पोस्टमध्ये फेले देवर इच्छे अचे (तुला ठार मारायचे आहे) असे म्हटले आहे.या विद्यार्थ्याने म्हटले आहे की, ही पोस्ट पाहिल्यानंतर, मी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेबद्दल काळजीत पडलो. मी पोलीसांना विनंती केली की अशा समाजविघातक टिप्पणीविरोधात पुरेशी कारवाई करा.
भट्टाचार्य नावाच्या हे प्राध्यापक म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांविरुध्द कोणत्याही प्रकारची टिप्पणी केली नाही. तक्रारदार हा तृणमूल कॉँग्रेसचा समर्थक आहे. त्यामुळेच त्याने माझ्याविरुध्द तक्रार दिली आहे. पोलीस यावर काय पावले उचलतात हे पाहून कायदेशिर सल्ला घेणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App