ममता बॅनर्जी दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर ; आज सायंकाळी मुंबईत दाखल होणार


मंगळवारी सायंकाळी मुंबईत दाखल झाल्यानंतर सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत.Mamata Banerjee on a two-day tour of Mumbai; Will arrive in Mumbai this evening


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मागील आठवड्यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दिल्ली दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती.दरम्यान आज ( मंगळवारी) सायंकाळी ममता बॅनर्जी दोन दिवसाच्या दौऱ्यासाठी मुंबईत दाखल होणार आहेत.

या दौऱ्यात बॅनर्जी या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटणार असल्याचे समजते. मंगळवारी सायंकाळी मुंबईत दाखल झाल्यानंतर सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत.


Mamata Banerjee : पीएम मोदींबद्दल बोलताना ममतांची जीभ घसरली, स्वत: हिंदू ब्राह्मण असल्याचीही केली आठवण


तसेच बुधवार १ डिसेंबर रोजी उद्योग जगतातील मान्यवरांशी चर्चा करणार आहेत.या दौऱ्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नाच्या स्वागत सोहळ्यालाही उपस्थित राहतील. त्यानंतर रात्री उशिरा मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बुधवारी मुंबईतील उद्योगपतींशी भेटीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यानंतर शरद पवार यांची भेट घेऊन गुरुवारी कोलकात्याला परतणार आहेत.
पुढील वर्षी एप्रिल महिन्यात बंगालमध्ये जागतिक व्यापार परिषद भरविण्यात येणार आहे. या परिषदेत अधिकाधिक उद्योजकांनी सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न करणार आहेत.

Mamata Banerjee on a two-day tour of Mumbai; Will arrive in Mumbai this evening

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण