वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सामाईक प्रवेश परीक्षेत (CAT 2021) महाराष्ट्राचा झेंडा फडकला असून राज्यातील चार विद्यार्थी सर्वाधिक गुण मिळवून अव्वल ठरले आहेत. त्या पाठोपाठ उत्तर प्रदेशचे दोन आणि हरियाणा, तेलंगण, पश्चिम बंगालमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. Maharashtra’s four tigers top in CAT; The flag of Maharashtra fluttered in the results of the examination
संपूर्ण भारतातील विविध IIM च्या विविध पदव्युत्तर आणि फेलो प्रोग्राममध्ये प्रवेश घेण्यासाठी CAT आवश्यक आहे. CAT गुणांचा वापर MBA प्रोग्राममध्ये प्रवेशासाठी सूचीबद्ध नसलेल्या IIM सदस्य संस्थांद्वारे देखील केला जाऊ शकतो.
सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला आहे. कॅटचे संयोजक प्रो. एमपी राम मोहन यांनी सांगितले की, ९ उमेदवारांनी ( सर्व पुरुष) १०० टक्के गुण मिळवले. त्यापैकी ७ अभियांत्रिकी पार्श्वभूमीचे आहेत. सर्वाधिक गुण मिळविणाऱ्यापैकी चार महाराष्ट्राचे आहेत, तर दोन उत्तर प्रदेशचे आणि प्रत्येकी एक हरियाणा, तेलंगणा आणि पश्चिम बंगालचे आहेत.
एकोणीस जणांना (सर्व पुरुष) ९९.९९ टक्के गुण प्राप्त झाले आहेत. यापैकी १६ अभियांत्रिकी पार्श्वभूमीचे आहेत. मोहन म्हणाले की, १८ पुरुष आणि एक महिला अशा १९ विद्यार्थ्यांनी ९९.९८ टक्के गुण मिळवले आहेत. गुणांच्या आधारे IIM आता त्यांच्या पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी त्यांची शॉर्टलिस्ट जारी करतील. ८८ बिगर IIM संस्था त्यांच्या व्यवस्थापन कार्यक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी यावर्षी कॅटचे गुण वापरतील.
परीक्षा २८ नोव्हेंबर रोजी भारतातील १५६ शहरांमधील ४३८ परीक्षा केंद्रांवर घेतली होती. नोंदणी केलेल्या २.३० लाखांपैकी सुमारे १.९२ लाख उमेदवार परीक्षेला बसले होते. एकूण उपस्थिती अंदाजे ८३ % होती. परीक्षा दिलेल्या १.९२ लाख उमेदवारांपैकी ३५ % महिला, ६५ % पुरुष आणि २ उमेदवार ट्रान्सजेंडर होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App