Positive news : महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशात कोरोनाच्या रूग्णसंख्येत सातत्याने दैनंदिन घट; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा निर्वाळा; प्रतिबंधक उपायांमध्येही कमतरता नाही

वृत्तसंस्था

नवी दिल्ली – एकीकडे कोरोना कहराच्या बातम्यांनी देशवासीयांना वात आणलेला असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मात्र आज दुपारी ४.०० वाजताच एक सकारात्मक बातमी दिली आहे. देशभरातील १८ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये कोरोनाच्या रूग्णांची संख्या घटण्याचा ट्रेंड सुरू झाल्याची ही बातमी आहे. Maharashtra, Uttar Pradesh, Andhra Pradesh, Delhi, Rajasthan, Haryana, Chhattisgarh, Bihar ad Gujarat also showing continuous decrease in daily new COVID19 cases: Ministry of Health

महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, दिल्ली, राजस्थान, आंध्रप्रदेश, हरियाणा, छत्तीसगड, बिहार, गुजरात, उत्तराखंड, झारखंड, तेलंगण, उत्तराखंड, अंदमान – निकोबार बेटे, दमण – दीव, लक्ष्वद्वीप, लडाख या राज्यांमध्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये कोरोनाग्रस्तांचा दैनंदिन आकडा घटत चालला आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती केंद्रीय आरोग्य सचिव लव आगरवाल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.

सध्या १३ राज्यांमध्ये १ लाखापेक्षा कोरोनाच्या ऍक्टीव केसेस आहेत. तर ६ राज्यांमध्ये ५० हजार ते १ लाखादरम्यान ऍक्टीव केसेस आहेत, अशी माहिती आगरवाल यांनी दिली.

कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, ओरिसा, पंजाब, आसाम, गोवा, जम्मू – काश्मीर, हिमाचल प्रदेश, पुद्दुचेरी, मणिपूर, मेघालय, त्रिपूरा, नागालँड, अरूणाचल प्रदेश या राज्यांमध्ये कोरोना पेशंट्सची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे, अशी माहिती देखील लव आगरवाल यांनी दिली. या पत्रकार परिषदेत त्यांनी प्रत्येक राज्याचा कोविड चार्ट देखील सादर केला.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांमध्येही कमी नाही

काही राज्यांमध्ये कोरोनाचे आकडे घटताना दिसत असले, तरी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये केंद्र सरकारने कोणतीही कमी आणलेली नाही. पीएम केअर फंडातून १ लाख ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स आणण्यात आले आहेत. ५८०५ मेट्रीक टन ऑक्सिजन आयात करण्यात आला आहे. ७०४९ मेट्रीक टन कपॅसिटीचे ३७४ टँकर्स एअरलिफ्ट करण्यात आले आहेत. १५७ स्पेशल ऑक्सिजन ट्रेन्स चालविण्यात आल्या. भारतीय हवाई दलाने ऑक्सिजनचे ८१ कंटेनर्स आयात केले, अशी माहिती गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली आहे.

 

Maharashtra, Uttar Pradesh, Andhra Pradesh, Delhi, Rajasthan, Haryana, Chhattisgarh, Bihar ad Gujarat also showing continuous decrease in daily new COVID19 cases: Ministry of Health