महाराष्ट्राचे पोलीस माफिया, भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांचा आरोप


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे पोलीस माफियासारखे वागत असल्याचा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला. कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी माझ्यासह मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी वा तक्रार करणाऱ्यांनी माझ्याविरोधात पुरावा दाखवावा, असे आव्हान सोमय्या यांनी दिले आहे.Maharashtra police mafia, BJP leader Kirit Somaiya’s allegations

महाराष्ट्र पोलिसांनी किरीट सोमय्या व त्यांचे पुत्र नील किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आयएनएस विक्रांत बचाव मोहिमेसाठी मुंबईत निधी गोळा केल्याची कबुली सोमय्या यांनी दिली. आयएनएस विक्रांत बचाव मोहिमेत शिवसेनेचे नेतेही सामील झाले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या संमतीने ही बचाव मोहीम सुरू केली होती. निधी गोळा करण्यासाठी आलेल्या सेनेच्या नेत्यांची नावे सोमय्या यांनी उघड केली नाहीत.



आयएनएस विक्रांत’ जहाज वाचविण्यासाठी २०१३-१४ किंवा २०१४-१५मध्ये राजभवनाच्या नावावर गोळा करण्यात आलेले पैसे राज्यपालांकडे जमा करण्यात आले काय, अशी विचारणा माहितीच्या अधिकाराखाली धीरेंद्र उपाध्ये यांनी केली होती. त्यावर अशी कोणतीही रक्कम जमा करण्यात आली नसल्याचे राज्यपालांच्या कार्यालयाने त्यांना लेखी उत्तरात दिल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता.

राऊत यांचा आरोप आहे की, किरीट सोमय्या यांनी देशाच्या संरक्षण व्यवस्थेची आणि राष्ट्रीय भावनेची शुद्ध फसवणूक केली. हा देशद्रोह आहे, असा भाजपचा झेंडा घेऊन देशद्रोही सोमय्यांनी ५७ कोटी रुपये गोळा केले. हा आकडा शंभर कोटींच्या वर असेल. ही रक्कम राजभवनात जमा झालेली नसेल, तर ती कुठे गेली? ती कोणाच्या घशात आणि खिशात गेली? ही रक्कम त्या काळात भाजपने निवडणुकीत वापरली की सोमय्यांच्या निकॉन इन्फ्रामध्ये वापरण्यात आली, असे सवाल राऊत यांनी केले.

Maharashtra police mafia, BJP leader Kirit Somaiya’s allegations

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात