कोरोनावरील दोन्ही डोस देण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – देशभरातील सुमारे ५०.१० कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरणात उत्तर प्रदेश आघाडीवर असून तेथे ५.२८ कोटी लोकांना लस दिली आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्र ४.५९ कोटी आणि तिसऱ्या क्रमांकावर गुजरात असून तेथे ३.५० कोटी लोकांना डोस देण्यात आला आहे.Maharashtra leads in vaccinartion

दोन्ही डोस देण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात गेल्या सात महिन्यात १ कोटी १७ लाख ४० हजार ६० जणांना दोन्ही डोस देण्यात आले. त्यानंतर पश्चिकम बंगालचा क्रमांक लागतो. तेथे ८९ लाख ७१ हजार १०३ जणांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत ८२ लाख ४२ हजार २०५ जणांना डोस देण्यात आले आहेत.



सरकारने दिलेल्या माहितीनुसार, काल शुक्रवारी चोवीस तासात देशभरात ४३.२९ लाख डोस देण्यात आले. आरोग्य मंत्रालयाने म्हटले, की १८ ते ४४ वयोगटातील एकूण १७.२३ कोटी लोकांना पहिला डोस तर १.१२ कोटी लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. पाच राज्यात मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये या वयोगटातील लोकांना १ कोटींपेक्षा अधिक डोस दिले गेले.

Maharashtra leads in vaccinartion

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात