माफिया अतिक अहमदचा खास शूटर असद कालियाला अटक, ५० हजारांचा होता इनाम!

arrest aasad

असद कालिया अनेक गुन्ह्यांमध्ये वाँटेड होता.

विशेष प्रतिनिधी

प्रयागराज : माफिया अतिक अहमद टोळीचा आणखी एक शूटर असद कालिया याला बुधवारी उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रयागराज येथून अटक केली आहे. कालिया हा अतिक अहमदचा अत्यंत जवळचा सहकारी असल्याचे सांगितले जाते. असद कालिया अनेक गुन्ह्यांमध्ये वाँटेड होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर ५० हजारांचे बक्षीसही जाहीर केले होते. Mafia Atiq Ahmeds special shooter Asad Kaliyala arrest

एसओजीने धूमगंज आणि पूरमुफ्ती पोलिसांसह अतिक अहमदच्या खास गुंडाला सापळा रचून अटक केली. याचबरोबर त्याच्या आणखी दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे सर्व घटनांबाबत चौकशी करण्यात येत आहे.

५० हजाराचे बक्षीस जाहीर –

डिसेंबर २०२१ पासून आजतागायत असद विरुद्ध धमकावणे आणि खंडणीची मागणी करण्याचे चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असदच्या अटकेवर पोलिसांनी ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. काही दिवसांपूर्वी २०१९चा एक व्हिडिओ देखील प्रसारित झाला होता, ज्यामध्ये असद त्याच्या साथीदारांसह एका व्यक्तीच्या घरी जातो आणि गेटमधून धमकी देतो व विटा फेकताना आढळून येतो. तो अतिकच्या जमिनीचा व्यवसाय पाहत होता.

डीसीपी नगर दीपक यांनी सांगितले की, असदला अटक करून त्याची चौकशी करण्यात येत आहे. त्याच्या सांगण्यावरून शस्त्रे जप्त करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.

Mafia Atiq Ahmeds special shooter Asad Kaliyala arrest

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात