राज्यातील वीज कंपन्यांचा तोटा ९० हजार कोटींपर्यंत पोहोचले, निती आयोगाचा अहवाल

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :कोरोना महामारीचा देशातील विविध राज्यांतील वीज कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. २०२१ मध्ये वीज कंपन्यांचा तोटा ९० हजार कोटींपर्यंत पोहोचला आहे. निती आयोगाने उर्जा क्षेत्रातील थिंक टॅँक असलेल्या आरएमआय या संस्थेसोबत केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.Losses of power companies in the state reached Rs 90,000 crore, report of the Policy Commission

देशातील विविध राज्यांनी राज्य विद्युत मंडळे बरखास्त करून महापारेषण, महावितरण, महाजेनको यासारख्या कंपन्या स्थापन केल्या होतय. डिस्कॉम ही त्यांची शिखर संस्था आहे. केंद्रीय उर्जा मंत्री आर के सिंह यांनी म्हटले आहे की, २०१९-२०२० या आर्थिक वर्षात डिस्कॉमने तोटा कमी करण्यासाठी पावले उचलली होती.



दरांमध्ये वाढ करणे, बिलींग आणि संकलनाची कार्यक्षमता सुधारणे यासारख्या उपायांमुळे डिस्कॉमचा तोटा ३८ टक्यांनी घटून ३८ हजार कोटी रुपयांपर्यंत खाली आला होता. २०२०-२१ या आर्थिक वर्षात कंपन्यांनी आणखी उपाययोजना केल्यामुळे तोटा आणखी कमी होण्याची शक्यता होती. मात्र, कोरोना महामारीमुळे पुन्हा एकदा वीज कंपन्यां आर्थिक संकटात सापडल्या आहे.

निती आयोग आणि आरएमआय यांनी अनेक उपाययोजनांची शिफारस केली आहे. यामध्ये डिस्कॉमला अधिक स्वायत्तता प्रदान करणे, वीजदरांमध्ये वेळेत सुधारणे, व्यवसायातील वाढती स्पर्धा आणि या लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी खाजगी क्षेत्राचा मोठा सहभाग यांचा समावेश आहे.

आरएमआयचे व्यवस्थापकीय संचालक क्ले स्ट्रेंजर म्हणाले, डिस्कॉमच्या समस्यांवर दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याची गरज आहे.कोरोनाला रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहक विभागांकडून वीजेची मागणी विस्कळित झाली आहे. त्यामुळे वीज कंपन्यांच्या महसुलात घट झाली आहे.

Losses of power companies in the state reached Rs 90,000 crore, report of the Policy Commission

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात