आर्थिक गाडा वेगाने रूळावर; वीज, इंधनाची मागणी वाढली; वाहन विक्रीत वाढ

  • वाहन उद्योग, बँकिंग सेक्टर, औषध निर्मिती, आयटीमधून सकारात्मक आकडेवारी

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना अनलॉक परिणामकारक होत असून आर्थिक गाडा वेगाने रुळावर येत असल्याचे चिन्हे दाखवत आहे. वीज आणि इंधनाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. वाहन उत्पादन आणि विक्रीत 17 टक्क्यांनी वाढ दाखविण्यात येत आहे. शेअर बाजार सकारात्मक मोडमध्ये दिसतो आहे. हे सर्व निकष देशाचा आर्थिक गाडा वेगाने रुळावर येत असल्याचे दाखवत आहेत.

विविध आर्थिक संशोधक संस्थांनी जाहीर केलेल्या आकडेवारी आणि निष्कर्षानुसार देशाची आर्थिक स्थिती सुधारून त्याचा सकारात्मक परिणाम जीडीपी वर होईल. वित्त वर्ष 2021 मध्ये जीडीपी चीनसारख्या देशालाही मागे टाकेल, असा विश्वास अर्थतज्ञ व्यक्त करताहेत आहेत.

वाहन विक्रीच्या टक्केवारीने फेब्रुवारी 2020 ची टक्केवारी ओलांडली असून ती कोरोना पूर्व स्थिती येऊन पोहोचले आहे. औषध निर्मिती आयटी स्टील ऑटोमोबाईल उद्योगांमध्ये सकारात्मक वातावरण असून उत्पादन वाढीच्या दिशेने वेगाने वाटचालीचे आकडे तिथून येत आहेत. टीसीएससारख्या कंपन्यांनी याची दखल घेऊन कामगारांना विशेष सवलती देखील दिल्या आहेत.

रिझर्व बँकेने प्रसिद्ध केलेली आकडेवारीही याकडेच दिशा निर्देश करते या क्षेत्रात ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांचा ही कामगिरी सुधारत असून पर्यटन, हॉस्पिटँलिटी ही क्षेत्रे मात्र तितकीशी पुढे दिसत नाहीत. दिवाळीच्या मोसमात पर्यटन क्षेत्राला एरवी बहार येत असला तरी covid-19 च्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर या क्षेत्रातील मरगळ लक्षात येते. स्थानिक एअरलाइन कंपन्यांचाही कामगिरी सुधारलेली नाही.

याउलट शेती उत्पादन शेती अवजारे उत्पादनाची आकडेवारी वाढ दाखवत असून ट्रॅक्टर ची विक्री वाढल्याचे दाखवत आहे खरीप हंगामावर याचा सकारात्मक परिणाम दिसतो आहे बँकांचे पतधोरण कोरोना पूर्वस्थितीत येत असून पतपुरवठा वाढल्याची आकडेवारी जाहीर केली आहे. बँकांना एनपीएचा धोका वाढतानाही दिसत आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*