उत्तर प्रदेश सरकारने राज्यव्यापी लॉकडाउन १७ मेपर्यंत वाढविले, सकारात्मक परिणाम दिसू लागले


विशेष प्रतिनिधी

लखनौ : उत्तर प्रदेश सरकारने राज्यव्यापी लॉकडाउनची मुदत १७ मेपर्यंत वाढविली आहे. सध्या लागू असलेल्या लॉकडाउनचे चांगले परिणाम दिसून येत असल्याने संसर्गवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी आणखी काही काळ लॉकडाउन आवश्याक असल्याचे राज्य सरकारने सांगितले. Lockdown extends in UP

लॉकडाउनचे सकारात्मक परिणाम दिसून हेत आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यास याचा फायदा होत आहे. नवीन बाधितांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे आणखी फायदा होण्यासाठी १७ मेपर्यंत लॉकडाउन वाढविण्यात आला आहे,’ असे राज्य सरकारने लागू केलेल्या पत्रकात म्हटले आहे.


उत्तर भारतासाठी मुंबई, पुण्याहून विशेष रेल्वेगाड्या धावणार


या कालावधीत बहुतांशी व्यवहार बंद राहणार असले तरी अत्यावश्यहक सेवा, लसीकरण आणि औद्योगिक कामकाज सुरु राहणार आहे.  राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना २० मेपर्यंत सुटी जाहीर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या काळात ऑनलाइन वर्गही बंद असतील.

आधीच्या नियोजनानुसार उद्या (ता. १०) सकाळी लॉकडाउनची मुदत संपणार होती. आता, १७ तारखेला सकाळी ७ वाजेपर्यंत अत्यावश्य क आणि काही निवडक सेवा वगळता राज्यातील सर्व व्यवहार बंद असतील.

Lockdown extends in UP

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात