पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी आधी फोनही घेतला नाही, आता स्पष्टीकरणादाखल म्हणाले- हेलिकॉप्टरने येणार होते, पण शेवटच्या क्षणी पीएम मोदी रस्तेमार्गाने आले!

Laps In PM Modi Security Punjab CM Channi explanation, said- PM Modi was supposed to come by helicopter, but at the last moment He came by road

Laps In PM Modi Security : पीएम मोदींच्या सुरक्षेतील गंभीर त्रुटीवर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचे वक्तव्य आले आहे. स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना चन्नी यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षेत कोणतीही त्रुटी नसल्याचा दावा केला आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांनी स्वत: त्यांच्या सुरक्षेची सर्व व्यवस्था पाहिली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधानांना हेलिकॉप्टरने यायचे होते, मात्र शेवटच्या क्षणी त्यांचा मार्ग बदलण्यात आला आणि ते रस्त्याने आले. Laps In PM Modi Security Punjab CM Channi explanation, said- PM Modi was supposed to come by helicopter, but at the last moment He came by road


वृत्तसंस्था

चंदिगड : पीएम मोदींच्या सुरक्षेतील गंभीर त्रुटीवर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचे वक्तव्य आले आहे. स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना चन्नी यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षेत कोणतीही त्रुटी नसल्याचा दावा केला आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांनी स्वत: त्यांच्या सुरक्षेची सर्व व्यवस्था पाहिली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधानांना हेलिकॉप्टरने यायचे होते, मात्र शेवटच्या क्षणी त्यांचा मार्ग बदलण्यात आला आणि ते रस्त्याने आले.

दरम्यान, सीएम चन्नी यांनी असे थातूरमातूर स्पष्टीकरण देऊन आपल्या सरकारचा बचाव करण्याचा प्रयत्न चालवला आहे. मात्र, भाजप आणि गृहमंत्रालयाकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्याची संपूर्ण माहिती पंजाब सरकार आणि पोलिसांना देण्यात आली होती, यावर जोर देण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या मार्गाची माहिती फक्त पोलिसांनाच होती, असेही सांगण्यात आले आहे. पण तरीही एवढी मोठी चूक झाली आणि त्यांचा ताफा मध्येच थांबवण्यात आला. गृह मंत्रालयाच्या वतीने पंजाब सरकारकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे.

दुसरीकडे, एवढी गंभीर चूक होऊनही काँग्रेस अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. प्रत्येक प्रवक्ता, प्रत्येक कार्यकर्ता आणि आता सीएम चन्नीसुद्धा सुरक्षेत कोणतीही कमतरता नसल्याचे सांगत आहेत. अखेरच्या क्षणी मार्ग बदलल्याने ही घटना घडल्याचे ते सांगताहेत. रणदीप सुरजेवाला यांनीही अनेक ट्विट करून काँग्रेसची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने १० हजार जवान घटनास्थळी तैनात असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. पंतप्रधानांना हेलिकॉप्टरने यायचे होते, पण शेवटच्या क्षणी रस्तेमार्ग निवडला, ज्याची सरकारला कल्पना नव्हती, असेही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषदेत या संपूर्ण प्रकारात काँग्रेसचा खूनी हेतू असल्याचे सांगितले आहे. काँग्रेस पीएम मोदींचा द्वेष करते, असेही त्या म्हणाल्या. देशाच्या पंतप्रधानांची केसालाही धक्का लागलेला चालणार नाही आणि ज्यांनी असे प्रयत्न केले त्यांचा न्याय केला जाईल, असे त्या म्हणाल्या आहेत.

Laps In PM Modi Security Punjab CM Channi explanation, said- PM Modi was supposed to come by helicopter, but at the last moment He came by road

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात